एक्स्प्लोर

Ajinkya Rahane Retirement: संयमाचा 'अजिंक्य' तारा

Ajinkya Rahane Retirement: ८५ कसोटी, ९० वनडे आणि २० टी-ट्वेन्टी. अजिंक्य रहाणेच्या करिअरचा हा स्कोअर. व्हाईट बॉल क्रिकेटपेक्षा पारंपरिक कसोटी सामन्यांमध्ये त्याची बॅट दुमदुमली. ५ हजारहून अधिक धावा. ३८.४६ ची सरासरी. १२ शतकं. त्यातली ८ परदेश भूमीवर. ही आकडेवारी अजिंक्यच्या दर्जाची आणि गुणवत्तेची साक्ष देणारी अशीच आहे. याच अजिंक्यने गरज लागली तेव्हा संघाचं सुकाणू हाती घेतलं. कांगारूंच्या भूमीवरची २०२०-२१ ची ती मालिका आठवा. पहिल्या कसोटीत भारत सर्वबाद ३६. दारुण पराभव पदरी. आत्मविश्वास जमिनीत गाडला गेला होता. त्यात कॅप्टन विराट कौंटुबिक कारणासाठी मायदेशी परतलेला. मालिकेत ०-१ ने पिछाडी. निेराशेचं मळभ दाटलं होतं. समोर अंधार पसरला होता. त्या काळोखातच पुढच्या मॅचमध्ये खेळताना मेलबर्नच्या मैदानातल्या गवतावर अजिंक्यने प्रेरणेची नवी वात पेटवली. कसोटी क्रिकेटचा तुटपुंजा अनुभव असलेले शिलेदार हाताशी घेऊन अजिंक्य लढला. संघ तीन बाद ६१ अशा स्थितीत अजिंक्यने शतकी नजराणा पेश केला. त्याच्या क्लासिक शतकाने मोठी आघाडी मिळवून दिली. मधल्या फळीत महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचल्या. आपली टीम जिंकली. तिथूनच मालिका विजयाचं बीज संघात रोवलं गेलं.

ऑसी भूमीवर आपण सलग दुसरी कसोटी मालिका जिंकलो तेही तुलनेने नवख्या टीमला घेऊन. असाच आणखी तुरा त्याच्या शिरपेचात रोवला गेला. तो ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानात. जिथे रथीमहारथींना शतकाने हुलकावणी दिलीय. त्या मैदानातल्या ऑनर्स बोर्डवर अजिंक्य रहाणेचं नाव झळकलंय. करिअरची २०११ ते २०२३ अशी १२ वर्षे त्याने निष्ठेने संघाचं प्रतिनिधित्व केलं. २०१७-१८ नंतर त्याच्यासाठी संघातली स्पर्धाही आणखी तीव्र झाली. कालांतराने आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर गेल्यावरही आयपीएलच्या मैदानात धडक देत राहिला. अखेर त्याने आता आपली बॅट म्यान केलीय. संयमाचा हा अजिंक्य तारा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात दिसणार नाहीये. डोंबिवली लोकलमधून क्रिकेटची किट बॅग घेऊन चर्चगेटपर्यंतचा प्रवास करणारा, पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर पताका दुमदुमत ठेवणारा अजिंक्य निवृत्तीची घोेषणा करताना म्हणाला, मी कधी चुकलो कधी हरलो, पण तुम्ही मला कधी परकं मानलं नाहीत. त्याला बोलताना आणि आपल्याला ऐकतानाही मन गलबलून आलं. अजिंक्यच्या निवृत्तीने संयमी क्रिकेट पर्वाची सांगता झाली. जंटलमन क्रिकेटर अजिंक्यला पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC :  रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget