Old Pension Special Report : राज्यातले 18 लाख कर्मचारी उद्यापासून संपावर, पेन्शनचा मुद्दा काय?
Old Pension Special Report : राज्यातले 18 लाख कर्मचारी उद्यापासून संपावर, पेन्शनचा मुद्दा काय?
सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीवरून राज्य सरकारचं टेन्शन वाढलंय. सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने कर्मचारी संप करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यभरातील तब्बल १८ लाख कर्मचारी संपावर जाणारेत. निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना दिलं मात्र, त्यावर समाधान न झाल्याने उद्यापासून सरकारी कर्मचारी संपावर जाणारेत. दरम्यान, या संपामुळे सामान्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. राज्यातील शिक्षकांनीही संपाला पाठिंबा दिल्यामुळे, दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीवर त्याचा मोठा परिणाम होणारेय. ((त्याचप्रमाणे, अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या प्रक्रियेतही अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचसोबत लोकांची सरकारी कार्यालयांतील दैनंदिन कामंही रखडण्याची शक्यता आहे.