Uddhav Thackeray : 13 मिनिटात 54 वेळा Hindutva ; ठाकरेंची शिवसेना बॅक टू बेसिक्स? Special Report
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला..
आणि मविआमधले तिन्ही पक्ष वेगळा विचार करताना दिसू लागले..
त्यातही सर्वात मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. पक्ष टिकवायचा असेल तर मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवणे हे एकमेव ध्येय समोर आहे.. आणि त्यासाठी मविआचा मार्ग सोडून उद्धव ठाकरे स्वबळ आणि हिंदुत्वाचा विचार करताना दिसत आहेत. याचा त्यांना कितपत फायदा होईल त्याचा आढावा घेऊयात
उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाची कास धरली आहे का?
उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुन्हा बॅक टू बेसिक्स जातेय का?
विधानसभेत फटका बसल्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्दयाकडे झुकलेली पाहायला मिळेल का?
असे अनेक प्रश्न पडायचं कारण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आजची पत्रकार परिषद..
यात त्यांनी बांगलादेशातील हिंदुबद्दल काळजी व्यक्त केली..
बांगलादेशात हिंदू आणि भारतात मंदिरं सुरक्षित नाहीत अशी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
हे करत असताना उद्धव ठाकरेंनी १३ मिनिटात ५४ वेळा हिंदुत्व आणि २१ वेळा मंदीर शब्द उच्चारला आहे