Supriya Sule vs Ajit Pawar Baramati Constituency : बारामती कुणाची? ताई की दादाची? Special Report
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत ऐतिहासिक बंड केलं. त्यामुळे महाराष्ट्र हादरला... अशा परिस्थितीत ज्यांच्या बोटाला धरून राजकारणातलं पहिलं पाऊल टाकायला शिकले अशा शरद पवारांशीच अजितदादांनी प्रचंड मोठा संघर्ष सुरू केलाय. त्यात सुप्रिया सुळे वडिलांना आधार देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेतच. रोहित पवारही ताकदीने उभे राहिलेत. खरंतर, महाराष्ट्रातील सर्वात मोठं राजकीय घराणं आणि एकीचं प्रतीक असलेल्या पवार खानदानाची जडणघडण मुळात बारामतीत झालीय. अजितदादांच्या बंडाने महाराष्ट्राला आता एक प्रश्न पडलाय... बारामतीत काय होणार? बारामती ताईंची की दादांची? बारामतीची माती कुणाच्या कपाळाला गुलाल लावणार आणि कुणाला धूळ चारणार? यासाठीच या रिपोर्टमधून आपण फेरफटका मारणार आहोत, बारामती मतदारसंघाचा... चला तर मग... पवारांच्या बारामतीत...
All Shows

































