Shinde vs Thackeray SC : शिंदे - ठाकरे प्रकणावर उद्या सुनावणी, कुणाला काटे-कुणाला फुलं? ABP Majha
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात उद्या (14 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्वाचा दिवस आहे. हे प्रकरण आता सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? याचं उत्तर उद्या मिळणार आहे. साहजिकच या एका गोष्टीवर केसच्या निकालाचं वेळापत्रकही अवलंबून असणार आहे. हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेलं तर आणखी वेळ लागेल. जर सध्याच्या घटनापीठाकडे राहिलं तर मग सलग सुनावणी तातडीने सुरु होणार का याची उत्सुकता असणार आहे. या अगोदर दोन न्यायमूर्तींचं व्हेकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ आणि आता जर कोर्टानं विनंती मान्य केली तर सात न्यायमूर्तींचं बेंच असेल.
All Shows































