Special Reports On PM Modi Vs Congress | दलित, मुस्लिम मतांवरुन मोदींनी काँग्रेसला डिवचलं
Special Reports On PM Modi Vs Congress | दलित, मुस्लिम मतांवरुन मोदींनी काँग्रेसला डिवचलं
दलित आणि मुस्लिम समाजाची मतं काँग्रेससाठी अतिशय महत्वाची राहिलेली आहेत.. मात्र काँग्रेसचं आंबेडकर प्रेम आणि मुस्लिम प्रेम दोन्ही बेगडी आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. या टीकेला काँग्रेसने आक्रमकपणे उत्तर देत डाव भाजपवरच उलटवण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगभरातून अभिवादन करण्यात आलं राजकीय नेत्यांनीही श्रद्धांजली वाहिली... मात्र श्रद्धांजली वाहतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरून जोरदार राजकीय वाग्युद्धही रंगलं एका बाजूला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी... तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचं आंबेडकर प्रेम आणि मुस्लिम प्रेम दोन्ही बेगडी असल्याची टीका पंतप्रधानांनी हरियाणातल्या हिसारमधल्या भाषणात केली.. तर आंबेडकरांचे कोणते विचार अंमलात आणलेत असा प्रतिसवाल विचारत खरगेंनी मोदींचा वार परतवून लावण्याचा प्रयत्न केला
आंबेडकरांवरून सुरू झालेल्या वाग्युद्धानं वक्फ कायदा आणि मुस्लिम मुद्द्याकडे वळण घेतलं काँग्रेसनं आजवर मुस्लिम चेहऱ्याला अध्यक्षपदाचा मान का दिला नाही असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारलाय. तर मोदींच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी देशभरातील काँग्रेस नेत्यांची फळी पुढे सरसावली
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























