Special Report Sanjay Raut VS Deshpande चंद्रपुरात भाजपला साथ, मनसेचे ठाकरेंच्या शिवसेनेव टीकेचे बाण
Special Report Sanjay Raut VS Deshpande चंद्रपुरात भाजपला साथ, मनसेचे ठाकरेंच्या शिवसेनेव टीकेचे बाण
महापालिका निवडणुकीपूर्वी एकत्र आलेल्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आता खटके उडायला सुरुवात झालीय. चंद्रपूरमध्ये काँग्रेसऐवजी भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेनं चांगलंच फैलावर घेतलंय. कल्याणमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या टीकेची व्याजासह परतफेड करण्याचा चंगच मनसेनं बांधल्याचं दिसतंय. पण ज्या प्रकारे हा वाद वाढू लागलाय, त्यावरून पेल्यातलं हे वादळ मोठं होण्याची चिन्हं दिसू लागलेत. पाहूया, याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट.
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मनसेसोबत असं शाब्दिक युद्ध सुरु झालंय.
सलग दुसऱ्या दिवशी दोन्हीकडून शाब्दिक टीकेचे बाण एकमेकांवर सोडले जातायत.
कल्याणमध्ये मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या टीकेची सध्या मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे व्याजासह परतफेड करताना दिसतायत.
गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी संजय राऊतांना असं फैलावर घेतलंय.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या



























