Special Report : Pahalgam Terror Attack : पहलगामचे मारेकरी 'हमास'ही वाटेकरी? लष्कर ए तय्यबाच्या अतिरेक्यांना हमासची प्रेरणा
Special Report : Pahalgam Terror Attack : पहलगामचे मारेकरी 'हमास'ही वाटेकरी? लष्कर ए तय्यबाच्या अतिरेक्यांना हमासची प्रेरणा
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे सबळ पुरावे हाती येतायत. दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना पाकिस्तानचीच फूस आहे हे आता उघड होतंय. त्याच वेळी जगातील आणखी काही जिहादी अतिरेकी संघटनेचा या हल्ल्यात कुटील सहभाग असू शकतो. ही दुसरी तिसरी कोणी नसून पॅलेस्टिनची हमास जिहादी संघटना आहे. ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला करुन १२०० नागरिकांना मारणाऱ्या हमासने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरकाव केला आहे. पहलगामचा हल्ल्यामागे या हमासचीच प्रेरणा असल्याचं बोललं जातंय. हजारो किलोमीटर दूरवरीील या इस्लामी जिहादी संघटनेचं भारताला विरोध असण्याचं कारण काय ते जाणून घेऊया.
(मोंटाज- ७ ऑक्टोबर २०२३- इस्रायलवरील हमास हल्ला, पीओकेमधील अतिरेकी मीटिंगचे व्हिज, पहलगाम हल्ला ))
VO
पॅलेस्टिनची जिहादी अतिरेकी संघटना हमासचे पहलगाम हल्ला प्रकरणात धागेदोरे समोर आले आहेत..
सातासमुद्रापार इस्रायलसोबत लढणारी ही इस्लामी अतिरेकी संघटना सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रीय होतेय
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या हजारो जिहादी अतिरेक्यांनी एकाच वेळी गाझापट्टीमधून इस्रायलमध्ये घुसले होते.
तिथल्या वाळवंटातील प्रसिद्ध म्यूझिक फेस्टिवलवर तसंच नागरी वस्तीत घुसून बेछूट गोळीबार, बॉम्बवर्षाव केला होता. त्यात लहान मुलं, गर्भवती महिला,तरुणाई, म्हातारीकोतारी सर्वांचा समावेश होता. १२०० निशस्त्र , निष्पाप नागरिक त्यात मारले गेले होते.
पहलगाम हल्ल्यात तोच हमास पॅटर्न आहे याकडे इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधलं होतं.
त्याला आता आधार मिळतो आहे .
५ फेब्रुवारीला म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या अडीच महिने आधीच पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमास आणि लष्करे तय्यबाच्या म्होरक्यांची भेट झाली होती
त्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होतायत
हमासच्या एन्ट्रीने जिहादी दहशतवादी कारवायांचं समीकरण बदललं आहे.
All Shows

































