Special Report on Dinanath Hospital : मृत्यूपूर्वी लुटीच्या तक्रारी, दीनानाथ रुग्णालयात काय घडलं?
Special Report on Dinanath Hospital : मृत्यूपूर्वी लुटीच्या तक्रारी, दीनानाथ रुग्णालयात काय घडलं?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने (Deenanath Mangeshkar Hospital) उपचार नाकारल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या आरोपांनी राज्यात खळबळ उडाली. अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी आंदोलने केली, त्यानंतर दीनानाथ रूग्णालयाने (Deenanath Mangeshkar Hospital) त्यांचीच एक समिती नेमून या मृत्यूप्रकरणात रूग्णालयाची चूक नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज्य शासनाचा दीनानाथ रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) घडलेल्या प्रकरणी आता चौकशी अहवाल समोर आला असून यात या प्रकरणी रूग्णायावरची ठपका ठेवण्यात आला आहे, त्याचबरोबर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषद घेत चौकशी अहवालाबाबत माहिती दिली. या अहवालानुसार रुग्णालय दोषी आढळले असून रुग्णालयाने कोणतेही नियम पाळले नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
रुग्णाची मेडिकल हिस्ट्री केवळ डॉक्टरला
रूपाली चाकणकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, 'भिसे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करतात, कारण चांगली ट्रिटमेंट मिळावी. या रुग्णाची ट्रिटमेंट डॉक्टर घैसास यांच्याकडे सुरू होती, 15 मार्च रोजी रुग्ण आणि डॉक्टरांची पहिली भेट झाली होती. यावेळी डॉक्टरांनी रुग्णाची संपूर्ण हिस्ट्री सांगण्यात आली होती. रुग्णाची मेडिकल हिस्ट्री केवळ डॉक्टरला माहिती होती. पण घटना घडल्यानंतर दिनानाथ रुग्णालयाला चौकशीसाठी स्वत:ची समिती नेमली आणि त्यात अहवाल दिला. त्या अहवालात रुग्णालयाने स्वत:ला वाचवण्यासाठी रुग्णाच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीय गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या. त्याचा निषेध करते. याबाबत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला समज दिली जाईल. यावर कुटुंबाने आक्षेप घेतला असून तसं लेखी पत्र आयोगाला दिलं आहे. तसंच यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. या आढावा बैठकीत यावर चर्चा झाली.'
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























