Special Report : कहाण्या... पॉलिटिकल 'गुरु'त्वाकर्षणाच्या! राजकीय नेते आणि त्यांचे गुरु
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत... बातमी गुरुत्वाकर्षण या संदर्भातली... पण मंडळी हे गुरुत्वाकर्षण जरा वेगळंय... आम्ही बोलत आहोत ते गुरुंबद्दलच्या आकर्षाणाबद्दल...
त्याचं झालं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीला गेले. तिथं त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर पुढे ते एका मंदिरात गेले. तिथं तर त्यांनी ज्योतिषाकडून भविष्य जाणून घेतल्याचा आरोप झाला... आणि मुख्यमंत्र्यांवर अंधश्रद्धाळू असल्याचा ठपका लागला.... खरंतर राजकारणी आला की त्यांच्या मागे एखाद्या धर्मगुरुचा हात हा असतोच. काही मोजके नेते सोडले तर जवळपास प्रत्येक नेत्यांचं एक श्रद्धस्थान असतंच.. आणि आता एकनाथ शिंदेंच्या निमित्तानं आम्हीही थोडा रिसर्च केला.. आणि इतिहासातील अशाच गुरु-शिष्यांच्या कहाण्या तुमच्या समोर आणल्या... पाहुयात.
All Shows




























