Sanjay Raut On Sharad Pawar : एकनाथ शिंदेंना पुरस्कार, मविआत 'दीवार'? Rajkiya Sholay Special Report
राज्याच्या राजकारणाला ढवळून काढणारी एक घटना काल दिल्लीत घडली आणि त्याची कंपनं इथे राज्यात दिवसभर जाणवली. कार्यक्रम होता एका सत्काराचा. त्या सत्कार सोहळ्याने राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरु झाली. त्यातच सत्कार ज्यांच्या हस्ते झाला, त्या राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या ज्येष्ठ नेत्यावर त्यांच्याच मित्रपक्षाच्या टीकेचे बाण सोडले. राज्याच्या राजकारणात दिवसभर चर्चेत राहिलेल्या या कार्यक्रमाने कुणाचा तिळपापड झाला, कुणाला गुदगुल्या झाल्या, कुणी कुणाला वाहिल्या लाखोल्या. पाहूया राजकीय शोलेचा हा रिपोर्ट.
काल नवी दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित केल्यावर शिवसेना ठाकरे गटाचा अक्षरशः तीळपापड झालंय. सत्कारावर उद्धव ठाकरेंनी तीव्र नापसंती व्यक्त केलीय. कट्टर विरोधक असलेल्या शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार करणं टाळायला हवं होतं असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. शिवसेना पक्षफुटीला कारणीभूत ठरलेल्या शिंदेंचा सत्कार पवारांनी केल्यावर उद्धव ठाकरे शरद पवारांवर नाराज असल्याचं समजतंय. महाविकास आघाडीत या निमित्ताने मोठं वादळ निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. शरद पवारांनी केलेल्या सत्कारानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पाठराखण करताना दिसतायत तर उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत आणि खासदार मात्र पवारांच्या कृतीवर जोरदार टीका करत आहेत.
All Shows
































