Sambhaji Nagar : 13 हजार पगार, 21 कोटींचा अपहार; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप Special Report
Sambhaji Nagar : 13 हजार पगार, 21 कोटींचा अपहार; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप Special Report
छत्रपती संभाजीनगरातील कंत्राटी कर्मचारी असलेला एक तरुण बीएम़डब्ल्यू कार घेतो. शहरात फोर बीएचके फ्लॅट विकत घेतो. पण यासाठी त्यानं पैसा कुठून आणला? कोण आहे हा व्यक्ती आणि त्यानं केलेला २१ कोटींचा घोटाळा, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
२१.५ कोटींचा घोटाळा कसा केला?
आरोपी हर्षलकुमारनं पैसे लाटण्यासाठी क्रीडा विभागाच्या उपसंचालकांचं नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेला इमेल पाठवला
इमेलद्वारे आरोपीनं क्रीडा विभागाच्या खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला
मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू केली आणि आपल्या दोन खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले
एकूण बारा पेक्षा जास्त अकाऊंटवर आरोपीनं पैसे ट्रान्सफर केले.
हर्षलकुमार क्षीरसागरच्या एका खात्यात तब्बल ३ कोटी रुपये आढळले.