Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत वेगळे मुद्दे समोर आणत रोहित पवारांनी काही नवे सवाल उपस्थित केलेत. सीआयडी कार्यालयात तपासाचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांना तिथं एकही अधिकारी उपस्थित नसल्याचं दिसलं. त्यामुळं त्यांचा पारा चांगलाच चढला. सरकार तपासाबाबत गंभीर आहे का असा सवाल विचारत त्यांनी तपास यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर भोंदू मांत्रिक अशोक खरातचा अजितदादांच्या अपघात प्रकरणाशी संंबंध दाखवणारे काही धक्कादायक मुद्देही उपस्थित केले. पाहूया, याविषयीचा सविस्तर रिपोर्ट.
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला तीन महिने पूर्ण झालेत.
मात्र त्यांच्या अपघाताबाबत उत्तरं मिळण्याऐवजी प्रश्नच वाढत चाललेत.
अजितदादांच्या मृत्यूमागची कॉन्स्पिरसी थिअरी असल्याचा संशय वारंवार व्यक्त करणाऱ्या रोहित पवारांनी आज सीआयडी कार्यालयाला भेट दिली.
त्यावेळी तिथं अधिकारीच हजर नसल्यामुळं रोहित पवारांचा हिरमोडही झाला आणि संतापही.
सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची स्पर्धा होती. तिथं क्रिकेट बघण्यासाठी आणि सहभाग घेण्यासाठी अधिकारी मुंबईला गेले होते. त्यामुळे वेळ मिळाला नसावा. एक अधिकारी कोलकात्याला गेले. आम्ही चौथ्यांदा येऊ तेव्हा कदाचित वॉचमनशी संवाद साधावा लागणार आहे. त्यामुळे आम्ही रिकाम्या खुर्चीचा फोटो काढून आलो आहे. या तपासाला सीरियसली घ्या. सीआयडीकडूनही आणि सरकारकडूनही सीरियसनेस दिसत नाही.
सरकारला हा तपास गांभिर्यानं घेण्याची आठवण करून देणाऱ्या रोहित पवारांनी आपल्या पाठपुराव्याला काहीसं यश आल्याचंही म्हटलंय.
(दबाव आल्यामुळे डीजीसीएने अमेरिकेची ही कंपनी आहे एनटीएसबी याला घेतलंय. सांगितलंय की एफडीआर रिपोर्ट डाऊनलोड झाला आहे. गोंधळ होऊ नये यासाठी फॉरेन्सिक रिपोर्टही आम्हाला हवा आहे, असं सांगितलंय. त्यानंतर सीव्हीआर जळलाय असं सांगत होते. आनंदाची बातमी आहे. दबाव वाढवल्यामुळे जो सीव्हीआर जळला असं म्हणत होते, ती माहिती आता डाऊनलोड झाली आहे
All Shows
































