#Coronavirus कोण आहेत कोरोनाचे नवे सुपरस्प्रेडर? 14 दिवसांचं आयसोलेशन अर्धवट सोडणारे रुग्ण धोकादायक
राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाहीय. आज राज्यात सर्वाधिक 63,729 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 45,335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झाले आहे.
राज्यात आज 398 कोरोना बाधित रुग्णांच्या मत्युंची नोंद झाली असून राज्यातील मत्युदर 1.61 एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४ (१५.८९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,१४,१८१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,३८,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
All Shows

































