एक्स्प्लोर
Parth Pawar Land Deal : पार्थच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांनी हात झटकले? Special Report
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park) जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 'असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणीपण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही,' अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांनी या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत चौकशीचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला (BJP) आता 'कुबड्या' गरजेच्या असल्याने काहीही कारवाई होणार नाही आणि क्लीन चिट मिळेल, असा टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपला पुतण्या पार्थवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report

Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report

Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement





























