(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narayan Rane vs Vaibhav Naik Special Report : पुतळ्यावरुन जहरी वार, नाईक- राणेंचा आरोप धारदार!
सिंधुदुर्ग: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी गौप्यस्फोट केला आहे. मालवणमधील शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठीच्या पैशाचा वापर नारायण राणेंच्या लोकसभा प्रचारासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला आहे. जयदीप आपटेला पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत 26 लाख दिल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
वैभव नाईक म्हणाले, शिल्पकार जयदीप आपटे याला महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत एकूण 26 लाख रुपये देण्यत आले आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तर जिल्हा नियोजन नमधून 5, 54, 35,000 रुपये नौसेना दिनाला खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना दोन्हीकडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने जो कार्यक्रम मालवणमध्ये केला त्या कामाच्या पैशातून नारायण राणेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आले आहे.
मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनचा पैसा का वापरला? वैभव नाईकांचा सवाल
वैभव नाईक म्हणाले, पाच ते सहा दिवसांनी निलेश राणेंनी पुतळा कोसळला त्यात माझा हात असल्याचे पुरावे देतो म्हणाले, मात्र आता एक महिना पूर्ण होत आला तरी पुरावे देऊ शकले नाहीत. लोकांचं लक्ष भ्रष्टाचार कडून दुसरीकडे वळवण्यासाठी असे आरोप केले. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन देखील जिल्हा नियोजनच्या पैशातून टाकलं आहे.