एक्स्प्लोर

ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू

BEST Employees Credit society elections : लोणावळ्यातील विश्रामगृह मोठ्या किमतीने खरेदी करुन 12.40 कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप संचालकांवर करण्यात येत आहे.

मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवत असलेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची एन्ट्री झाली आहे बेस्ट कर्मचारी पतसंस्थेची 12 कोटी 40 लाखांना फसवणूक केल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ही निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. बेस्ट पतपेढीवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्याआधीच आता पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने त्यामागे काही राजकारण आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

विश्रामगृह खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप

दुय्यम निबंधकाची परवानगी न घेता लोणावळा येथील विश्रामगृह अवाच्यासव्वा दरात खरेदी केल्याचा आरोप संचालक मंडळावर होत आहे. विश्रामगृहाची किंमत दुय्यम निबंधकाने रेडिरेकनरच्या दरानुसार 5.63 कोटी रुपये ठरवली असताना विश्रामगृह 18 कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पतसंस्थेतील सभासदाच्या तक्रारीवर संचालक मंडळाची आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना संचालक मंडळ चौकशीच्या फेऱ्यात सापडल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

ठाकरे बंधू एकत्र

मुंबईत बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्रित बैठक पार पडली. बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत. बैठकीला संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि बेस्ट युनियनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

महापालिकेत एकत्र लढणार

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याविषयी अजूनही चर्चा सुरु असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली. केवळ मुंबईच नाही तर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक या तीन महापालिकांच्या निवडणुकीतही ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचं राऊतांनी सांगितलं. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपचं पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात

बेस्ट पतपेढी निवडणूक ठाकरेंच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल ठरलंय. भाजपचं सहकार समृद्ध पॅनल निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीची जबाबदारी फडणवीसांचे शिलेदार समजल्या जाणाऱ्या आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला सहकारी म्हणून आशीर्वाद राहणार असं प्रसाद लाड यांनी सांगितलंय. तसंच सहकारात उद्धव ठाकरे यांच कर्तृत्व शून्य आहे, अशी टीकाही आमदार प्रसाद लाड यांनी केली.

ही बातमी वाचा:

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Shivsena Name And Symbol Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Embed widget