एक्स्प्लोर

Independence Day: स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण

यावर्षी काँग्रेस मुख्यालयात तिरंगा इतक्या उंचीवर बांधण्यात आला होता की तो रिमोटद्वारे फडकवण्यात आला. यावेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने वातावरण देशभक्तीने भरले.

Rahul Gandhi Mallikarjun Kharge Flag hoisting at Congress headquarters: देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील या समारंभात उपस्थित होते आणि पाऊस असूनही छत्रीशिवाय कार्यक्रमात सहभागी झाले. यावर्षी काँग्रेस मुख्यालयात तिरंगा इतक्या उंचीवर बांधण्यात आला होता की तो रिमोटद्वारे फडकवण्यात आला. यावेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने वातावरण देशभक्तीने भरले. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून राहुल गांधी यांनी 'एक्स'वर लिहिले की, "सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने मिळालेले हे स्वातंत्र्य, सत्य आणि समानतेच्या पायावर न्याय आधारित भारत निर्माण करण्याचा संकल्प आहे. प्रत्येक हृदयात आदर आणि बंधुता असली पाहिजे. या मौल्यवान वारशाचा अभिमान आणि सन्मान जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. जय हिंद, जय भारत." 

स्वातंत्र्य, संविधान आणि त्याची तत्त्वे जपण्याचा आमचा संकल्प दृढ

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही 'एक्स' च्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि लिहिले की, आमच्या लाखो वीरांनी असंख्य बलिदान देऊन आम्हाला स्वातंत्र्य दिले. त्यांनी आम्हाला लोकशाही, न्याय, समानता आणि परस्पर एकतेचा राष्ट्रीय संकल्प दिला. त्यांनी आम्हाला एक व्यक्ती - एक मत या तत्त्वाद्वारे समृद्ध लोकशाही दिली. आमचे स्वातंत्र्य, संविधान आणि त्याची तत्त्वे जपण्याचा आमचा संकल्प दृढ आहे. जय हिंद! जय भारत!" 

लाल किल्ल्यावर उपस्थित राहिले नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर तिरंगा फडकावला आणि देशाला संबोधित केले. शाळा, सरकारी इमारती आणि विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. विरोधी पक्षाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी गेल्या वर्षी आसन व्यवस्थेवर नाराज होते, ज्यामुळे ते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.

तथापि, दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियावर स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या संदेशात न्याय, सत्य आणि समानतेवर आधारित भारत निर्माण करण्याचा आपला संकल्प पुन्हा व्यक्त केला, तर खरगे यांनी या दिवसाला लोकशाही मूल्यांना पुन्हा समर्पित करण्याची संधी म्हटले.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget