एक्स्प्लोर

लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा

Latur Rain: औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प 73% भरला असून माकणी येथील निम्न तेरणा धरण 85% क्षमतेपर्यंत भरले आहे.

Latur: लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह धरणक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने धरणे भारत आली आहेत. तेरणा मांजर नद्या दुथडीभरून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. लातूर जिल्ह्यात रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तावरजा, तेरणा आणि मांजरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा जोर वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भुसनी डॅमची दरवाजे वेळेवर न उघडल्याने तावरजा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प 73% भरला असून माकणी येथील निम्न तेरणा धरण 85% क्षमतेपर्यंत भरले आहे. पाणलोट क्षेत्रात आणखी पावसाची शक्यता असल्याने दोन्ही प्रकल्पांतून पाणी सोडण्याची तयारी सुरू आहे. (Latur Rain Update)

मांजरा आणि तेरणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली

दरम्यान, लातूर जिल्हा सीमा भागातील औराद शहाजानी परिसरात काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा आणि तेरणा नदीच्या संगमस्थळी पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. औराद शहाजानी–वांजरखेडा रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधणे, नदी–नाले व पुलांपासून दूर राहणे, मुलांना पाण्याजवळ न पाठवणे आणि पूरप्रवण भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे

लातूर जिल्ह्यातील तावरजा नदीच्या परिसरात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत संततधार पाऊस झाला. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भुसणी बॅरेजमध्ये साचले. मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात शिरून पिके जलमय झाली. यातूनच झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

मुसळधार पावसाने तेरणा डॅम ओव्हरफ्लो

धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने तेरणा डॅम ओव्हरप्लो झाला. तेरणा डॅम वर लोक पर्यटनाला गर्दी करत आहेत. डॅमवरील अरुंद फुलांवर लोकांनी गर्दी केली. सुट्टी असल्यामुळे कुटुंबासह पर्यटनाला येत आहेत. तरुणांची गर्दी आहे. पाण्याचा प्रवाह मोठा आहे मात्र प्रशासनाकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही.

डोळ्यासमोर पीक पाण्यात बुडालं, लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

लातूर जिल्ह्यातील तावरजा नदीच्या परिसरात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत संततधार पाऊस झाला. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भुसणी बॅरेजमध्ये साचले. मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात शिरून पिके जलमय झाली. यातूनच झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भुसणी बॅरेजमध्ये साचले, मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात घुसून पिके जलमय झाली. या घटनेत 50 वर्षीय शेतकरी खंडू रामकिसन देवकते यांच्या कुटुंबीयांची आठ एकर शेती त्याची दीड एकर शेती आहे..शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. हातात आलेले पीक डोळ्यासमोर नष्ट झाल्याने ते मानसिक तणावात गेले आणि सकाळी गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget