Pune Express Highway : मुंबई - पुणे Express Way वरील अपघातांचं सत्य, माझाचा SPECIAL REPORT
एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं भीषण अपघातात निधन झालं. त्यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. आणि त्यानंतर त्याच एक्स्प्रेस वेवरच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर प्रश्न उपस्थित झाले. त्यातच आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशनही सुरु होतेय. त्यामुळेचं आम्ही राज्यकर्त्यांना एक्स्प्रेस वेवरचं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खरंच, महामार्गावर होणाऱ्या सगळ्या अपघातांसाठी अवजड वाहनंचं जबाबदार असतात का? अपघातासाठी नेमकं कोणकोणत्या गोष्टी जबाबदार असतात? आणि प्रत्येकवेळी अवजड वाहनांवरच आरोप का लागतात. तर त्याचीच उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही पुणे- मुंबई - पुणे असा प्रवास केला. प्रवासाची सुरुवात एका अवजड वाहनातूनच केली. आणि त्याच प्रवासादरम्यान अनेक गोष्टी अजेडात आल्या. रात्रीच्या काळोखात मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर कशी असते वाहतूक...पाहुयात...
तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे...दोन शहरांना जोडणारा सर्वात वेगवान मार्ग आहे. पण, जितका वेगवाग तितकाच धोकादायक. कारण, हा महामार्ग सुरु झाल्यापासून इथल्या अपघातांची संख्या काही नियंत्रणात आलेली नाही. त्यातच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनानंतर अनेक महामार्गावरच्या इतर सुविधांचीही चर्चा सुरु झाली. त्यामुळेच टीम एबीपी माझानं पुणे- मुंबई - पुणे असा प्रवास केला. आणि एक्स्प्रेस वेवरच्या सुविधांचा आढावा घेतलाय...