Petrol - Diesel Price Today : मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 115 रुपये, दरवाढीला ब्रेक कधी लागणार?
Petrol-Diesel Price Today: देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या वाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. लागोपाठ पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. आज रविवारी पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 35 पैशांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 109.34 रुपये झालं. तर डिझेल प्रति लीटर 98.07 रुपये झालं आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये विक्रम वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 109.34 रुपये झालं तर डिझेलची किंमत प्रतिलीटर 106.23 रुपये झाली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 109.79 रुपये, तर डिझेलचे दर 101.19 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 102.25 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.