Mock Drill India : युद्धाची पूर्वतयारी, महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये होणार मॉक ड्रिल Special Report
२२ एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. पण या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला आता धडा शिकवण्याचा निर्धार केलाय. सध्या दोन्ही देशांमधला तणाव टोकाला पोहोचलाय. सीमेवर युद्धाचे ढग दाटलेयत. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारनं बुधवारी देशातील सगळ्याच राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. यात तुमच्याही शहराचा समावेश आहे का? उद्याच्या दिवसात राज्यात नेमकं काय घडणार आहे? हे मॉक ड्रिल म्हणजे काय? ते का केलं जातं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणारा पाहूयात हा खास रिपोर्ट....
((मोंटाज सायरन.... मॉक ड्रिलचे व्हीज...))
तुमच्याही शहरात घुमणार सायरनचा आवाज...
((सायरन...))
महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये होणार मॉक ड्रिल
((व्हीज... विथ म्युझिक इम्पॅक्ट))
महाराष्ट्रात वाजणार युद्धसज्जतेसाठी सायरन..
((व्हीज... विथ म्युझिक इम्पॅक्ट))
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर
भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमालीचा वाढलाय
दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धाचे ढग दाटलेयत...
आणि म्हणूनच युद्धसज्जतेसाठी महाराष्ट्रात बुधवारी मॉक ड्रिल पार पडणार आहे...
राज्यातल्या १६ शहरांमध्ये एकाच वेळी हे मॉक ड्रिल होणार आहे....
पीटीसी - प्रतिनिधी
((केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातील २४४ शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. युद्धामुळे तणाव वाढला, युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर अशा आपत्कालीन स्थितीत काय करावं यासाठी हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे.))
आता हे मॉक ड्रील म्हणजे नेमकं काय? आणि ते नेमकं कसं केलं जाणार? ऐकूयात...
बाईट - प्रभात कुमार, संचालक, नागरी संरक्षण दल
((कसं केलं जाणार मॉक ड्रिल?
बाजूला ग्राफिक्स चालवा.....))
हे मॉक ड्रिल करताना अनेक यंत्रणांचाही यात समावेश असणार आहे...
बाईट - प्रभात कुमार, संचालक, नागरी संरक्षण दल
((कोणत्या यंत्रणांचा समावेश
बाजूला ग्राफिक्स चालवा.....))
महाराष्ट्रातल्या१६ ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे
या ठिकाणांची तीन श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे...
((ग्राफिक्स इन))
पहिली श्रेणी
१. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई
२. जेएनपीटी, उरण
३. तारापूर अणुऊर्जा केंद्र,
दुसरी श्रेणी
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ वायशेत
८. रोहा-नागोठणे
९. मनमाड, नाशिक
१०. सिन्नर, नाशिक
११. पिंपरी चिंचवड
तिसरी श्रेणी
१२. छत्रपती संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग
((ग्राफिक्स आऊट))
याठिकाणी हे मॉक ड्रिल पार पडणार आहे...
बाईट - एखाद्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांचा
१९७१ साली भारत-पाकमध्ये युद्ध झालं होतं...
त्या युद्धावेळी मॉक ड्रिल कसं करण्यात आला याचा अनुभव
ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी एबीपी माझाशी शेअर केला...
बाईट - ब्रिगेडियर हेमंत महाजन
((फक्त त्यावेळचा किस्सा))
आता या मॉक ड्रिलनं नेमकं काय साध्य होणार तेही जाणून घ्या...
बाईट - कर्नल अभय पटवर्धन
((मॉक ड्रीलचा फायदा))
बाईट - प्रभात कुमार, संचालक, नागरी संरक्षण दल
((नागरिकांना आवाहन))
केंद्राच्या आदेशानुसार राज्य सरकारही या मॉक ड्रिलसाठी सज्ज आहे...
बाईट - देवेंद्र फ़डणवीस
((केंद्रसरकारच्या आदेशाप्रमाणे, ठरवून दिलेल्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पार पडेल))
पण यावर ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवरच तोफ डागलीय...
बाईट - संजय राऊत, खासदार
((उद्या मॉक ड्रिल होणार आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत
जनतेला तुम्ही मानसिक दृष्ट्या अडकून ठेवलाय. आमचा युद्ध सराव होणार आहे, म्हणजे आमच्या हातात बंदूका देणार आहेत का?))
१९७१ च्या भारत-पाक युद्धात
भारतानं पाकिस्तानची धूळदाण उडवली होती...
आज ५४ वर्षांनी पुन्हा एकदा
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे....
हे मॉक ड्रिल त्याचीच पूर्वतयारी...
((व्हिज्युअल्स मोंटाज))
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























