Kokan Rain : कोकणात पावसाचा इशारा, येणार वादळी वारा? Special Report ABP Majha
पावसाळ्याचे चार महिने राज्यात सर्वधिक पाऊस कोकणात पडतो. यावेळी मे मध्येच पावसाने फटकेबाजी सुरु केली. कोकणात पावसाने सर्वात जास्त तडाखा रायगडला दिला. पाहुयातकोकणाला पाऊस नवा नाही,
इथे दर पावसाळ्यात सरासरी तीन साडे तीन हजार मिमी पाऊस पडतो.
पण उन्हाळ्याच्या मे महिन्यात इतका मुसळधार पाऊस पडेल असा स्वप्नातही विचार कोणी केला नसेल.
ती गोष्ट सत्यात उतरली आहे. त्यातही रायगडला दोन दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढलं.
कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, लोकांच्या घरात पाणी शिरलं तर कुठे धबधब्याच्या पाण्यामुळे मार्ग खचला. वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुरुड मध्ये झाला
मुरुड मध्ये 371 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दत्त मंदिर परिसरात नवीन बांधकाम कोसळलं. अनाधिकृत बांधकामांमुळे कोंडी होऊन पाणी थेट गावात शिरल्याने परिसराला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं.
Y:2605RAIGADRAIGAD D LIVE AND VIS
रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात ३०७ मिमी पावसाची नोंद झाली ,
वॉकथ्रू किंवा व्हिज - जे चांगले असेल ते
- Z:2605RAIGADSHRIWARDHAN VIS
किल्ले रायगड महामार्गावरील कोंझर घाटात धबधब्याच्या पाण्यामुळे मोरी परिसरातला बायमास मार्ग खचला.
वॉकथ्रू किंवा व्हिज -
Z:2605RAIGADKONZAR RAOD
कर्जत परिसरात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. जोरदार पावसाने उल्हास नदीला पूर आला, नेरळ- दहिवली पुल पाण्याखाली गेला. वाहतूक बंद करण्याची वेळ आली.
वॉकथ्रू किंवा व्हिज -
Z:2605RAIGADulhas river
Y:2605RAIGADkarjat wkt,vis
मुसळधार पावसाचा अलिबाग तालुक्यालाही मोठा फटका बसला, समुद्र खवळला, किनारपट्टी भागात भीती वाटावी इतक्या उंच लाटा पाहायला मिळाल्या.
Z:2605RAIGADalibag rain vis
पेणमध्ये मुसळधार पावसामुळे आमटेमजवळ रस्ता खचला.. मुंबई गोवा महामार्गाच्या वाहतुकीवर याचा बराच काळ परिणाम झाला
Y:2605RAIGADtrack vis
रोहा तालुक्यात दमखाडी परिसरात पाणी शिरलं. कुंडलिका नदीला जोडलेल्या नाल्यामुळे पाणी अचानक वाढलं आणि रस्त्यावर आणि इमारतीच्या भागात शिरलं
Z:2605RAIGADROHA VIS
दिवसभरात पनवेल तालुक्यात २१४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रायगडमध्ये मे महिन्यातच पावसाने जुलैचा विक्रमही मोडीत काढण्याचा चंग बांधला असं चित्र आहे. पुढचे काही तास रायगड रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.अत्यावश्यक असल्याशिवाय घाट भागात प्रवास टाळा असं आवाहन प्रशासनने केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































