बीडमध्ये आदिवासी कुटुंबाला अमानुष मारहाण, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबाचं आमरण उपोषण
पैशाच्या देवाणघेवानातून आदिवासी कुटुंबाला अमानुष मारहाण करण्यात आलीय. घटना बीडच्या शिवणी गावात घडलीय. आदिवासी कुटुंबाला अमानुष मारहाण होत असताना पीडित कुटुंबातील एका मुलाने मोबाईल मध्ये सर्व घटना कैद केली. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मारहाण झाल्यानंतर पीडित कुटुंब दोन दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र तक्रार देऊन देखील गुन्हा दाखल होत असल्याने आदिवासी कुटुंब आता जिल्हाधिकारी काचेरीसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. पिंपळनेर पोलीस जाणीवपूर्वक तक्रार घेत नसल्याचे पीडित उपोषण कर्त्यांचा आरोप आहे. जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा पीडित कुटुंबाने घेतला आहे.
All Shows
































