Indrayani Bridge Accident : 'फादर्स डे' दिवशीच बापलेकावर काळाचा घाला Spcial Report
रविवारी फादर्स डे होता. याचदिवशी पिंपरी चिंचवडमधले रोहित माने आपल्या लेकासह आणि पत्नीसह इंद्रायणी नदीवरचा कुंडमळा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. पण पूल दुर्घटनेत माने बापलेकावर मृत्यूनं झडप घातली... रोहित माने आणि त्यांचा सहा वर्षांचा लेक या दुर्घटनेत बळी पडला...
((व्हिज्युअल मोंटाज.... पुलावरची गर्दी... कोसळल्यानंतरचे व्हिज.... बचावकार्य...))
६ वर्षांचा विहान आणि त्याचे वडील रोहित माने
रविवारी घडलेल्या कुंडमळा पूल दुर्घटनेचे बळी ठरले...
कुटुंबासोबत रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या माने कुटुंबावर काळानं घाला घातला....
((माने फॅमिली... रडतानाचे व्हिज))
नुकताच सुरु झालेला पाऊस
आणि रविवारची सुट्टी...
त्यामुळे पुण्याच्या मावळमधील
इंद्रायणी नदीवरच्या या कुंडमळा धबधब्यावर मोठी गर्दी जमली होती....
शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणाऱ्या
या जुन्या पुलावरुन पर्यटक आणि स्थानिकांचीही येजा सुरु होती...
पण याचदरम्यान हा धोकादायक पूल कोसळला आणि एकच आक्रोश सुरु झाला....
((व्हिज्युअल्स....पडलेल्या वेळचे... लोकांचा आक्रोश))
स्थानिक आणि इतर पर्यटकांच्या साहाय्यानं
अनेकांना वाचवण्यात यश आलं....
पण या दुर्घटनेत ४ जण दुर्दैवी ठरले...
यात होते सहा वर्षांचा विहान आणि त्याचे वडील रोहित माने...
या बापलेकाच्या जाण्यानं माने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय
बाईट - निखिल कदम, रोहित माने यांचा मेहुणा
((मी कट करुन देतो बाईट...))
माने कुटुंब पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधलं...
रोहित माने हे मंहिंद्रा कंपनीत कामाला होते...
सुट्टी असल्यानं ते पत्नी आणि मुलासह
कुंडमळा इथं फिरायला आले होते....
पण घडलं भलतंच....
या दुर्घटनेत रोहित यांची पत्नीही गंभीर जखमी झालीये....
((व्हिज्युअल्स....))
कुंडमळा धबधब्याच्या ठिकाणी
वीकेंडला हजारो पर्यटक येतात
पण रविवारचा दिवस या पर्यटकांसाठी घातवार ठरला....
वैभव परब, एबीपी माझा, मावळ, पुणे
All Shows

































