Special Report | गजा मारणे...आधी मिरवणूक, नंतर फरार, आता जामीन;पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पुणे : गाजावाजा करत पुण्यात दाखल झालेल्या कुख्यात गुंड गजानन मारणेने पोलिसांच्या हातावर तुरी देत थेट न्यायालयातून जामीन मिळवला आहे. पुण्याच्या वडगाव मावळ न्यायालयात आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास तो हजर झाल्याची माहिती समोर आलीये. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्याने अशा प्रकारे कारवाई टाळलेली आहे.
मुंबई, रायगड आणि पुणे अशा तीन जिल्ह्यातील पोलिसांच्या देखत अक्षरशः गाजावाजा करत गजानन घरी दाखल झाला होता. नंतर मात्र तो फरार झाला आणि त्याच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिसांची फौज त्याच्या मागावर होती. पण या दोन्ही पोलीस आयुक्तालयाच्या हातावर तुरी देत तो थेट वडगाव मावळ न्यायालयात हजर झाला आणि जामीन मिळवून मोकळाही झाला. तरी पोलिसांना याची काहीच कल्पना नव्हती ही मोठी शोकांतिका आहे. 15 फेब्रुवारीला त्याने माजवलेल्या उतमाताप्रकरणी पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिसांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते.