एक्स्प्लोर
Nanded Cloudburst: दुष्काळी Mukhed मध्ये आभाळ फाटलं, पाऊस काळ बनून कोसळला Special Report
मराठवाड्यातील दुष्काळी मुखेड, नांदेड तालुक्यात रविवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुखेडमध्ये सरासरी १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कधीच नोंदवला गेला नव्हता, मात्र यावेळी तब्बल २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उदगीर धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला पूर आला. नदीकाठची भेंडेगाव, भुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारचवाडी ही सहा गावे पाण्याखाली गेली. शेकडो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले, तर काही जणांना जीव गमवावा लागला. एका ग्रामस्थाने सांगितले, "गेले की पाच. सासरा गेले झालं." रावणगाव आणि हसनाळ या गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून, दिवसभर बचाव कार्य सुरू होते. लेंडी धरणाचे काम सुरू असताना पुनर्वसन न केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप ग्रामस्थांनी प्रशासनावर केला आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























