Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report
आधीच नाशिकमधल्या अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाची गल्ली ते दिल्ली चर्चा आहे... अशातच मुंबईच्या मालाड परिसरातील एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झालाय... रविवारी आणि गुरूवारी तो दरबार भरवायचा... आणि भूत उतरवण्याच्या नावाखाली लोकांचे खिसे रिकामे करायचा.. अखेर स्थानिकांच्या तक्रारीनंतर एबीपी माझानं त्या भोंदूचं बिंग फोडलं आणि त्याच्या हातात बेड्या पडल्या...पाहूयात
मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भोंदूबाबा दर गुरूवारी आणि रविवारी भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा करायचा. आतापर्यंत त्याच्या घरी, घरासमोर अशाप्रकारच्या पूजा किंवा अशाप्रकारचे प्रताप तो करत होता... मात्र 4 एप्रिलला त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांसमोर पूजा करत उघडपणे भूत उतरण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार केल्याचं स्थानिकांनी सांगितलं. भोंदूबाबा त्याच्या पूजा साहित्यात बकऱ्याचा कलेजा, काळं कापड, लाल कापड, स्मशानातली राख, लिंबू, टाचणी, दारूची बाटली, कुंकू, सिगरेट अशा वस्तू घ्यायचा. चार रस्ते जिथे मिळतात तिथे तो पूजा झाल्यावर या वस्तू फेकत असे. जादूटोण्याच्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये विशेषतः महिला, मुलांमध्ये घबराटीचं वातावरण होतं. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन आठवड्यानंतर रिदम पांचाळवर गुन्हा दाखल केला आणि आज त्याला अटक केली.
हा भोंदूबाबा लोकांना धमकवायचा. आपल्याविरोधात तक्रार केल्यास काळी जादू करुन मारुन टाकण्याची धमकी देत होता, अशी माहिती दिंडोशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दिली. त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी..
नाशिकमधील भोंदू अशोक खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर राज्याच्या विविध भागातून महिलांचं शोषण करणारे अनेक भोंदू समोर येऊ लागलेत. अशोक खरातनं महिलांचं लैंगिक शोषण केलं..शिवाय अनेकांची फसवणूकही केली..स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं म्हणत हे भोंदू साध्याभोळ्या भाविकांना आपल्या जाळ्यात ओढतात..आणि अघोरी पूजा, लैंगिक अत्याचार, फसवणुकीसारखे प्रकार करतात. पुण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्यला अटक झाली..हा भोंदू स्वतःला शंकराचा अवतार म्हणायचा..तर तिकडे संगमनेरमध्ये मंत्रोच्चारानं आजार बरे करणाऱ्या बाबाचे व्हिडीओज सध्या व्हायरल होतायत..त्याच्याविरोधात अजून गुन्हा दाखल झालेला नाही..मात्र त्यांनं लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे..मालाडमधूनही असंच प्रकरण समोर आलंय..भूत उतरवण्याची बतावणी करत रिदम पांचाळ नावाचा भोंदू अघोरी पूजा करायचा..त्याचे अघोरी प्रकार पाहून कुणालाही धडकी भरेल..त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय..
All Shows
































