Ajit Pawar Special Report : दादापण भारी देवा! दादांनी मिळवली वजनदार मंत्रिपदं
राज्यात सध्या दोन गोष्टी चर्चेत आहेत...एक म्हणजे हाऊसफूल असलेला बाई पण भारी देवा हा सिनेमा आणि दुसरं म्हणजे अजित दादा.. १२ दिवासांपूर्वी जे ९ जण विरोधी पक्षात होते.. तेच आता थेट मंत्री झालेत.. दादांची पॉवर खातेवाटपातही पहायला मिळालीये.. सर्व मालाईदार खाती अजित पवार गटाला मिळाली आहेत.. महत्त्वाचं अर्थ खातं दादांच्या पारड्यात पडलंय. या एका खात्यामुळे दादांचं पारडं अधिक भक्कम झालंय. पण दुसरीकडे याच निर्णयामुळे शिवसेनेला घाम फुटण्याची शक्यता आहे.. मविआच्या काळातही दादाच अर्थमंत्री होते..आणि त्यावेळी दादांनी शिवसेनेला निधीवाटप केलं नाही असा आरोप अनेकदा झाला.. पण ज्या दादांवर शिवसेनेने आरोप केले तेच दादा पुन्हा एकदा अर्थमंत्री बनले.. त्यामुळे दादापण भारी देवा असंच म्हणण्याची वेळ आलीय.
All Shows

































