Air India : एअर इंडियाच्या तांत्रिक बिघाडाचा प्रवाशांना फटका Special Report
अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा कारभार विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. १२ जूनला दुर्घटना झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच अनेक फ्लाईट्स रद्द झाल्या. तर काही फ्लाईट्सनी उशीरानं टेकऑफ केलं. महत्वाचं म्हणजे मंगळवारी एकाच दिवशी लंडन आणि पॅरिसला जाणाऱ्या तीन फ्लाईट्स रद्द झाल्या. पण यामागची नेमकी कारणं काय? यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या? पाहूयात....
अहमदाबाद ते लंडन... ((ग्राफिक्स प्लेट... एअर इंडियाचं विमान))
दिल्ली ते पॅरिस... ((ग्राफिक्स प्लेट... एअर इंडियाचं विमान))
बंगळुरु ते लंडन... ((ग्राफिक्स प्लेट... एअर इंडियाचं विमान))
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर
एअर इंडियाच्या अनेक फ्लाईट्स रद्द होणं
किंवा मग तांत्रिक कारणामुळे उशीर होणं हे प्रकार
गेल्या दोन दिवसात अनेक वेळा पाहायला मिळालेयत...
((व्हिज्युअल मोंटाज....))
मंगळवारी अहमदाबाद ते लंडन फ्लाईट
एअर इंडियानं अचानक रद्द केली....
पण यामागचं नेमकं कारण काय होतं?
पीटीसी - प्रतिनिधी
((एअर इंडियाचं बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान मंगळवारी दुपारी एक वाजून १० मिनिटांनी अहमदाबादवरुन लंडनला जाणार होतं. पण काही तांत्रिक कारणामुळे हे विमान लंडनला जाण्यासाठी उडालच नाही. हे तांत्रिक कारण म्हणजे या प्रवासासाठी विमानच उपलब्ध नसल्याचं एअर इंडियानं म्हटलंय.))
पण यामुळे प्रवाशांना मात्र
प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय...
बाईट - नैन्सी, प्रवासी
बाईट - अनिरुद्ध सिंह गाला, प्रवासी
((R AHM AIR INDIA PASSENGER TT 170625))
अहमदाबाद दुर्घटनेनंतर
विमान रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती....
याआधीही एअर इंडियाच्या अनेक फ्लाईट्स
गेल्या दोन-तीन दिवसात रद्द केल्या गेल्या....
पीटीसी - प्रतिनिधी
((मंगळवारी आणखी एक रद्द होणारी एअर इंडियाची फ्लाईट म्हणजे AI 143. दिल्लीहून पॅरिसला उड्डाण करण्याआधी या विमानात चाचणीदरम्यान काही तांत्रिक समस्या आली. आणि त्यामुळे ही फ्लाईट रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतला. मात्र तिकीटाचे पूर्ण पैसे परत देण्याचं आणि कोणत्याही शुल्काशिवाय फ्लाईट रिशेड्यूल करण्याचं आश्वासन एअर इंडियानं दिलंय....))
याशिवाय बंगळुरु ते लंडन
ही मंगळवारी रद्द झालेली एअर इंडियाची तिसरी फ्लाईट...
एआय १३३ हे विमान दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी लंडनला निघणार होतं....
((व्हिज्युअल्स....))
((ग्राफिक्स इन))
एअर इंडियामागे शुक्लकाष्ठ
---------------------------------------------
१६ जून
हाँगकाँग ते दिल्ली फ्लाईट
उड्डाणानंतर पुन्हा
विमानतळावर लँड
कारण - तांत्रिक समस्या
----------------
दिल्ली ते रांची फ्लाईट
उड्डाणानंतर पुन्हा
विमानतळावर परतलं
कारण - तांत्रिक समस्या
-----------------
१३ जून
दुबई ते जयपूर फ्लाईट उशीरानं
एसीशिवाय प्रवासी ५ तास विमानात अडकून
कारण - तांत्रिक समस्या
((ग्राफिक्स आऊट))
१२ जूनच्या दुपारी
अहमदाबादवरुन लंडनला जाणारं
एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं
या दुर्घटनेत २७० जणांनी आपला जीव गमावला
मात्र या दुर्घटनेचा एअर इंडियाच्या विमानवाहतुकीवरही परिणाम झालाय....
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























