Ahmedabad Plane Crash mayday call : संकटात संदेश पाठवला पण 50 सेकंदात खेळ संपला.. Special Report
अहमदाबादमधील विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात असेल.
टेक ऑफ नंतर आवश्यक उंचीवर विमान जात नाहीय हे वैमानिक सुमीत सभरवाल यांच्या लक्षात आल, त्यांनी 'मे-डे कॉल' केला, म्हणजे विमान संकटात आहे असा संदेश हवाई वाहतूक यंत्रणेला पाठवला. पण कोणतीही मदत मिळण्याच्या आत सगळा खेळ अवघ्या ५० सेकंदात संपला. काय असतो हा मेडे कॉल, आपत्काळात काय महत्व असतं या कॉलचं ते जाणून घेऊयात
अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या विमानाने हवेत झेप घेतली खरी पण व्यवस्थित टेक ऑफ म्हणजे उड्डाण भरण्याच्या आतच ते कोसळलं. कोसळण्यापूर्वी वैमानिकाने 'मेडे कॉल' म्हणजे मदतीची आर्त हाक सुद्धा मारली होती. मात्र फार उशीर झाला होता. काय असतो हा मेडे कॉल, कधी केला जातो मेडे कॉल नंतर काय होतं ते पाहुयात
१०५ वर्षांपूर्वी हा शब्द पहिल्यांदा वैमानिकाने वापरल्याची नोंद आहे. मेडे सिग्नल आल्यानंतर एटीसी, बचाव यंत्रणा समन्वय साधतात आणि तातडीची मदत त्या विमानापर्यंत पोहोचवतात अहमदाबादमध्ये वैमानिकाचा मेडे कॉल हवेत विरण्याच्या आतच विमान कोसळलं या विमानाला मदत करता येईल, २४२ जीव वाचवता येतील हा विचार करण्याएवढा वेळही मिळाला नाही. या पेक्षा दुर्देव ते काय.
All Shows

































