Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 24 डिसेंबर 2024 : ABP Majha
बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं, यासंदर्भात अजित पवार, एकनाथ शिंदेसोबत बसून ठरवू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नसल्याचंही केलं स्पष्ट.
सोमनाथ सूर्यवंशी दलित होता म्हणून त्याची हत्या झाली, हा राहुल गांधींनी काढलेला निष्कर्ष पुर्णपणे चुकीचा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची राहुल गांधींवर टीका.
अमित शाह यांचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालवल्या प्रकरणी काँग्रेसनं अगोदर माफी मागावी. काँग्रेसच्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया.
महाराष्ट्र देशातील कुठल्याही राज्यापेक्षा सुरक्षित राज्य आहे. कुठलीही घटना घडल्यानंतर असं राजकारण करणं शोभत नाही, जाती-जातीत विद्वेष निर्माण करायचाय, सुप्रिया सुळेंच्या महाराष्ट्र सुरक्षित नसल्याच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी लवकरच एसआयटी स्थापन होईल, सुरेश धस यांची माहिती, हत्येचा वाल्मिक कराड प्रमुख सूत्रधार, सुरेश धस यांचा आरोप.
बीड सरपंच हत्येवरुन सुरेश धस यांचा धनंजय मुडेंवर हल्लाबोल, धनंजय मुंडे आधी असे नव्हते, काय होतास तू? काय झालास तू?, धस यांचा खोचक टोला
बीड सरपंच हत्येप्रकरणी अंजली दमानियांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप,धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील व्यवहाराचे पुरावे एक्स पोस्टवर शेअर.
परभणीत ३२, तर अमरावती ग्रामीणमध्ये २४३ शास्त्र परवाने, मग बीडमध्ये १ हजार २२२ इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने का आणि कोणाच्या वरदस्ताने देण्यात आले, अंजली दमानियांचा एक्सपोस्ट करत सवाल.
मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदादांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांचं वक्तव्य, मागच्या वेळी पालकमंत्रिपद आणि मंत्रिपद भाड्याने दिलं होतं, धस यांचा खोचक टोला