एक्स्प्लोर
Water Cut Thane : ठाण्यात बुधवारी 12 तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांना बसणार फटका
ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना, ठाणे महानगरपालिकेतर्फे (Thane Municipal Corporation) शहरातील काही भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 'पिसे आणि टेमघर (Pise and Temghar) येथील जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशनमधील दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवारी, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे'. या १२ तासांच्या शटडाऊनमध्ये कंट्रोल पॅनलची दुरुस्ती आणि ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशनसारखी आवश्यक कामे केली जातील. यामुळे घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतुपार्क, कळव्याचा काही भाग आणि इतर अनेक ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे थांबणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
All Shows
Advertisement
Advertisement























