Majha Maha Katta : प्रत्येक बाप-लेकीसाठी प्रेरणादायी, Sharad Pawar Supriya Sule यांची एकत्र मुलाखत
Majha Maha Katta : प्रत्येक बाप-लेकीसाठी प्रेरणादायी, Sharad Pawar Supriya Sule यांची एकत्र मुलाखत
मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. तर मराठा सामजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये असे ओबीसी समाजातील नेत्यांचे मत आहे. या सर्व पेचप्रसंगावर खासदार शरद पवार यांनी तोडगा काढावा, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे. यावरच आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते एबीपी माझाने आयोजित केलेल्या ' माझा महाकट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.
मी लोकांशी संवाद साधणार आहे
"महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. कटुता, अवविश्वासाचं चित्र दसतंय. हे भयावह आहे. मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे," अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.