(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vitthal Kamat on Majha Katta : हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत 'माझा कट्टा'वर | Orchid Hotel Group
Vitthal Kamat on Majha Katta : हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत 'माझा कट्टा'वर | Orchid Hotel Group
आयुष्यात यश आणि अपयश यांच्यातील समतोल साधणे आवश्यक आहे. विठ्ठल कामत यांनी डोंगरा एवढ्या कर्जातून मार्ग काढत आज आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. रोजच्या जगण्यातील आर्थिक-मानसिक संतुलन कसे साधायचे, याबाबत उद्योजक विठ्ठल कामत यांनी (Vithal Kamat) आपले अनुभव माझा कट्टावर व्यक्त करत उद्योजक, प्रेक्षकांना मार्गदर्शन केले. कोणीही कधीही, कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या करू नये. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर डोंगर कोसळतो. त्यांना याचा त्रास अधिक होतो. कधीही आत्महत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले. विठ्ठल कामत यांनी सांगितले की, आत्महत्या करण्याचा विचार पक्का झाला होता. त्यावेळी मरीन ड्राइव्हवरून चालत होतो. सायंकाळची वेळ असल्याने सूर्य परतीच्या वाटेवर होता. त्या बुडत्या सूर्याकडे कोणीही पाहत नव्हते. सगळ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. आपली देखील परिस्थिती हीच आहे. त्यानंतर ऑफिसला आलो. त्यावेळी एक रंगारी समोरच्या इमारतीला सुरक्षित उपकरणे न लावता रंग लावत होता. अवघ्या सहा हजार रुपयांसाठी जीव धोक्यात घालून त्याने काम केले. त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळाली. दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याला सगळ्यांनी नमस्कार केला. या प्रसंगाला पाहून अपयशासोबत दोन हात करण्याची हिंमत मिळाली असल्याचे व्यावसायिक विठ्ठल कामत यांनी सांगितले.