Majha Katta : ' शास्त्रीय संगीताला अध्यात्मिक बैठक महत्त्वाची...' पं.शौनक अभिषेकी 'कट्ट्या'वर
संगीत विश्वातील अग्रगण्य आणि ज्येष्ठ गायक आणि संगीतकार पं. शौनक अभिषेकी यांच्याशी आज माझा कट्ट्यावर सुरेल गप्पा रंगल्या. स्वर्गीय स्वरांनी रसिकांना समृद्ध करणाऱ्या पं. जितेंद्र अभिषेकींचा सांगीतिक वारसा समर्थपणे पेलत आणि जपत शौनक अभिषेकींनी संगीत क्षेत्रात नवे आयाम शोधले आहेत. खरंतर शौनक यांच्या जन्मापासून संगीत त्यांच्या आजूबाजूला आहे. वडिल अभिषेकी बुवांकडून मिळालेल्या उत्तम तालमीत संगीतातील प्रत्येक बारकावे शौनक यांनी हेरले, त्याला स्वतःच्या शैलीची जोड देऊन एक वेगळी शैली तयार केली.
समृद्ध वारसा लाभलेल्या आणि त्याची जपणूक करणाऱ्या संगीतकार पं. शौनक अभिषेकी यांच्या सोबतच्या दिलखुलास संगीतमय गप्पा खास माझा कट्ट्यावर.
All Shows

































