Harshal Morde Majha Katta : पुण्यातून झेप...जगभरात गगनभरारी; मोरडे चॉकलेटची यशोगाथा माझा कट्टावर
Harshal Morde Majha Katta : आपण तयार केलेला पदार्थ गिऱ्हाईकानं खरेदी करावा असे प्रत्येकाला वाटते. पण सुरुवातीला यामध्ये आम्हाला थोडा त्रास झाला. सुरुवातील आम्ही तयार केलेलं चॉकलेट बेकरीमध्ये घेतलं गेलं पण हॉटेलमध्ये विक्री व्हायला थोडा वेळ लागल्याचे मत मोरडे चॉकलेटचे (Morde Chocolate) संचालक हर्षल मोरडे (Harshal Morde) यांनी व्यक्त केले. पण आम्ही निराश न होता जोमानं व्यवसाय केला. पण हळूहळू मोठ्या प्रमाणात चॉकलेटची विक्री होत गेल्याचे मोरडेंनी सांगितले. जगाच्या चॉकलेटच्या नकाशावर भारताला नेण्याचं स्वप्न असलेले मोरडे चॉकलेटचे संचालक हर्षल मोरडे हे माझा कट्ट्यावर (Majha Katta) आले होते. यावेळी त्यांनी मोरडे चॉकलेटच्या व्यवसायाबाबत माहिती दिली.
All Shows

































