TOP 50 : आत्तापर्यंतच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज: 25 May 2024 : ABP Majha
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अगरवालचा पाय खोलात...अपहरण आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल होणार...
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवालला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी...ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप
डोंबिवली स्फोटातील आरोपी मलय मेहता यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी, तर आईची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टात हजर केलं नाही
डोंबिवलीत रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू...मृतांचा शोध घ्यायला आलेल्या नातेवाईकांशी कंपनी मालक उद्धटपणा करत असल्याचा आरोप...
मी लंडनला जाऊ शकत नाही, मला मुख्यमंत्री केल्यानं राज्यात काम करावंच लागतं, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला...तर ठाकरे लंडनचे नाले बघायला गेलेत का, आशिष शेलारांचा हल्लाबोल...
मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
यवतमाळमध्ये तापमान ४४ अंशांच्या पार...गेल्या पाच वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद..