Special Report : रानडेतून पदव्युत्तर पत्रकारिता कोर्स हलवणार? बिल्डरला जागा देण्यासाठी खटाटोप?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पत्रकारितेचे शिक्षण देणारा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग डेक्कन मधील रानडे इन्स्टिट्यूटमधून चालवला जातो. पण रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारीतेचा पदव्युत्तर पदवीचा दोन वर्षांचा कोर्स हलवुन तो विद्यापीठाच्या आतमधील डिपार्टमेंट ऑफ मिडीया एन्ड मास कम्युनिकेशन स्टडीजमधे नेण्याचा प्रस्ताव सिनेटसमोर मांडण्यात आलाय. मात्र पत्रकारितेचा मराठी आणि इंग्रजी डिप्लोमा रानडे इन्स्टिट्यूटमधेच सुरु ठेवण्यात येणार आहे. मात्र पदव्युत्तर पदवीचा कोर्स रानडे इन्स्टिट्यूटमधुन हलवून हळुहळू रानडे इन्स्टिट्यूट मोडीत काढण्याचा हा डाव असल्याचा आरोप पत्रकारांकडून आणि माजी विद्यार्थ्याकडून होतोय.
त्यासाठी काल रानडे इन्स्टिट्यूटमधे पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन कळमळकर यांना भेटून हा निर्णय रद्द करण्यासाठी निवेदन दिलंय. रानडे इन्स्टिट्यूटच्या शेकडो कोटी रुपये किमतीच्या जागेवर डोळा ठेऊन पत्रकारीतेचा कोर्स हटवण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप या माजी विद्यार्थ्यांनी केलाय.
All Shows




























