एक्स्प्लोर

Kolhapur Fake Currency Case: कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद! कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार मास्टरमाईंड निघाला

कोल्हापूरातील बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा मिरजेत पर्दाफाश झाला आहे. पोलिस हवालदारासह पाच जणांना अटक करून 1.11 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि इनोव्हा कार जप्त करण्यात आली.

Kolhapur Fake Currency Case: कोल्हापुरातील (Fake Notes Racket Kolhapur) बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टरमाईंड असून त्याच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली. मिरजमधील (Miraj Police Raid) महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई केली. इनोव्हा कारसह 1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मास्टरमाईंड पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार (वय 44, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावडा, कोल्हापूर), सुप्रीत काहाण्या देसाई (वय 22, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), राहुल राजाराम जाधव (वय ३३, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय 40, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर), सिध्देश जगदीश म्हात्रे (वय 28, रा. रिध्द गार्डन, ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  त्यांना न्यायालयात हजर केले असता 13 ऑकटोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टरमाईंड (Police Havaldar Arrested)

चलनातील पाचशे, दोनशे रुपयांच्या हुबेहूब नोटा तयार करून (Fake Currency Printing in Kolhapur) त्या खपवण्यासाठी मिरजेत आलेल्या एकाला अटक करून सखोल चौकशीनंतर बनावट नोटांचा पर्दाफाश करण्यात आला. कोल्हापूर पोलीस दलातील (Kolhapur Police Corruption Case) हवालदार कार्यरत असणाऱ्या मास्टरमाईंडसह कोल्हापूर जिल्ह्यातील चौघासह मुंबईतील एक अशा पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून इनोव्हा कारसह 1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे (Sandeep Ghughe Press Conference) यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होत्या.

1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (1.11 Crore Fake Currency Seized)

सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस वेवर निलजी बामणी येथे एकजण बनावट नोटा खपवण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकसह छापा टाकून सुप्रीत देसाई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 42 हजार रुपये किमतीच्या पाचशेच्या 84 बनावट नोटा सापडल्या. त्याला कार आणि नोटासह ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर पोलीस (Kolhapur Crime 2025) हवालदार इब्रार इनामदार याच्या कोल्हापूर येथील रुईकर कॉलनी येथील ऑफिस मधून नोटा तयार करण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर तसेच अन्य साहित्य जप्त केले. या नोटा वितरित करण्यात सहभाग असणारे राहुल जाधव, नरेंद्र शिंदे तसेच मुंबई येथील सिद्धेश म्हात्रेला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून इनोव्हा कार, पाचशे रुपयांच्या 19 हजार 687 बनावट नोटा, दोनशे रुपयांच्या 429 नोटा, स्कॅनर, प्रिंटर असा 1.11 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, उपनिरीक्षक  रुपाली गायकवाड, पुनम पाटील, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, राहुल क्षीरसागर, नानासाहेच चंदनशिवे, बसवराज कुंदगोळ, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, चिनोद चव्हाण, विनायक झांबरे, संतोष डामसे, महेश गुरव, संदिप घोडे, विकास कांचळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, निवास माने, सुधीर खोंद्रे, सायबर पोलीस ठाणेकडील अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
Embed widget