(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tech News : YouTube व्हिडीओ पाहण्याबरोबरच आता गेमही खेळता येणार; अॅप्स डाऊनलोड करण्याचं टेन्शन आता संपलं
YouTube Playables feature : Google चे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube एका नवीन वैशिष्ट्याची चाचणी करत आहे.
YouTube Playables feature : यूट्यूबचा (You Tube) वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी आहे. Google चे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube एका नवीन वैशिष्ट्याची (New Feature) चाचणी करत आहे जे यूजर्सना प्लॅटफॉर्मवर गेम डाउनलोड आणि इंस्टॉल न करता खेळण्यास परवानगी देईल. कंपनी Playables नावाच्या फीचरवर सध्या काम करत आहे. सप्टेंबरमध्ये, कंपनीने घोषणा केली होती की यूजर्स मोबाईल आणि डेस्कटॉप या दोन्ही प्लॅटफॉर्मवर HTML5 आधारित गेम खेळू शकतील. सध्या हे वैशिष्ट्य काही मर्यादित यूजर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनीने होम फीडमध्ये Playables नावाचे नवीन फीचर जोडले आहे. अँड्रॉईड ऑथॉरिटीच्या अहवालात कंपनीचे एक नवीन वैशिष्ट्य दिसून आले आहे, ज्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी शेअर करण्यात आला आहे.
तुम्ही हे सर्व खेळ खेळू शकाल
नवीन वैशिष्ट्यांतर्गत तुम्ही 8 बॉल बिलियर्ड्स क्लासिक, अँग्री बर्ड्स शोडाउन, बास्केटबॉल FRVR, ब्रेन आउट, कॅनन बॉल्स 3D, कॅरम क्लॅश, कलर बर्स्ट 3D, कलर पिक्सेल आर्ट, क्रेझी केव्हज, क्यूब टॉवर, डेली क्रॉसवर्डचा आनंद घेऊ शकता. , Daily Solitaire, Scooter Extreme, Stack Bounce आणि State.io यांसारखे खेळ खेळू शकता. यातील बहुतेक गेम मोबाईल केंद्रित आहेत. पण, कंपनीने म्हटले आहे की, यूजर्स ते डेस्कटॉपवर देखील खेळू शकतात. लीक झालेल्या इमेजनुसार कंपनी पुढील वर्षी मार्चपर्यंत या फीचरची चाचणी करेल. याचा अर्थ असा की, नवीन Playables वैशिष्ट्य 2024 च्या मध्यात लॉन्च केले जाऊ शकते.
तुम्हाला ते आवडत नसल्यास टर्न ऑफ करू शकता
या संदर्भात YouTube चं म्हणणं आहे की, यूजर्स 'प्लेबल' करू शकतात तुमच्या होम स्क्रीनवर स्क्रोल करून किंवा "एक्सप्लोर मेन्यूमधील प्ले करण्यायोग्य लिंक" मिळू शकते. तुम्हाला व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर गेम पाहण्यात रस नसल्यास हे फीचर बंद करण्याचा पर्याय देखील आहे. म्हणजेच तुम्ही प्लेएबलचा पर्यायही बंद करू शकता. Playables कधी लाँच होणार याबाबत गुगलने सध्या कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. मात्र, कंपनी केवळ YouTube प्रीमियम सदस्यांपुरती मर्यादित करू शकते याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या नवीन फीचरचा यूजर्सना चांगलाच फायदा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :