(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Whatsapp update : व्हाट्सॲप वेब वापरत असलेल्या युजर्सना लवकरच मिळेल 'हे' नवीन फिचर्स!
व्हाट्सॲप दरवेळी आपल्या युजर्सला काही ना काही नवे (Whatsapp Update) अपडेट्स देत असतात. आता परत परत मोबाईल ओपन करायची गरज भासणार नाही. कोणतं आहे हे फिचर पाहुयात...
Whatsapp update : व्हाट्सॲप दरवेळी आपल्या युजर्सला काही ना काही नवे (Whatsapp Update) अपडेट्स देत असतात. आता परत परत मोबाईल ओपन करायची गरज भासणार नाही. व्हाट्सअपमध्ये असे कितीतरी फीचर्स आहेत जे वेब आणि डेस्कटॉप ॲपवर आलेले नाहीत, परंतु कंपनी आता अनेक फीचर्स व्हाट्सअप वेबवर आणणार आहे. ज्यामुळे त्यांच्या युजर्सना चांगला एक्सपिरियंस मिळू शकेल.
सोशल मीडिया कंपनी व्हाट्सॲप आपल्या वेब वर्जनमध्ये युजर्सना लवकरच एक नवीन फिचर देणार आहे. कंपनी आता वेब युजर्सना स्टेटस शेअर करण्याचा ऑप्शन देणार आहे. ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा फोन खोलायच्या अगोदर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमधून स्टेट्स किंवा पोस्ट करू शकणार आहात. व्हाट्सॲप तुम्हाला टेक्स्ट आणि मीडिया हे दोन्ही ऑप्शन देणार आहे.
सध्या तरी ही अपडेट काही व्हाट्सॲप वेब बीटा टेस्टर्स यांच्याकडे असल्याचा सांगितलं जात आहे. येत्या काळात कंपनी हा फिचर सगळ्या वेब युजर्सना देऊ शकते. वेब सोबतच डेस्कटॉप वर्जनमध्ये सध्यातरी स्टेटसला शेअर करण्याचा ऑप्शन मिळत नाही आहे. कदाचित येणाऱ्या काळात कंपनी हा फिचर यात सुद्धा देऊ शकते.
या फिचरची माहिती व्हाट्सॲपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणारी वेबसाईट webtainfo ने शेअर केली आहे. तुम्हाला सुद्धा व्हाट्सॲपच्या नवीन फिचर्सबद्दल माहिती मिळवायची असेल तर कंपनीच्या बीटा प्रोग्रामसाठी तुम्ही एनरोल करू शकता. व्हाट्सॲप मोबाईल ,डेस्कटॉप ,वेब आणि आयपॅड या सगळ्यांना बीटा व्हर्जन्स ऑफर करते.
'या' फिचरवरही सुरु आहे काम
व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे युजरनेम फीचर. या फीचरच्या मदतीने तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरशिवाय व्हॉट्सअॅपमध्ये एकमेकांना अॅड करू शकाल. युजरनेम फीचर इन्स्टाग्राम सारखेच असेल जिथे प्रत्येक व्यक्तीचे वेगळे नाव असेल. अलीकडेच कंपनीने WhatsApp मध्ये ईमेल लिंक आणि मल्टीअकाऊंट फीचरला सपोर्ट केले आहे. तुम्ही आता एकाच अॅपवर 2 अकाऊंट चालवू शकता.
स्टेटस अॅप देखील होणार अपडेट
सोशल मीडिया प्लॅटफोर्म असणारी दिग्गज कंपनी व्हॉट्सअॅप सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. स्टेटस टॅबमध्ये तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा लवकरच तुम्हाला रिप्लाय बार दिसेल. सध्या अॅपमध्ये असे काय होते की, जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा त्याला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला खाली दिसत असलेल्या रिप्लाय अॅरोवर क्लिक करावे लागते.पण लवकरच तुम्हाला रिप्लाय बारचा पर्याय बाय डिफॉल्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला कुठेही क्लिक करण्याची गरज नाही. तुम्ही रिप्लाय बारमध्ये मेसेज टाइप करून त्या व्यक्तीला थेट उत्तर देऊ शकता. या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅपच्या विकासावर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फिचरमुळे अॅप वापरणं अधिक सोप होणार आहे.
इतर महत्वाची बातमी-