WhatsApp Fake Calls : WhatsApp फेक कॉल रोखण्यासाठी भारत सरकारचा महत्वाचा निर्णय, युजर्सच्या सुरक्षिततेसाठी उचलले 'हे' मोठे पाऊल
बऱ्याच भारतीय व्हॉट्सअॅप युजर्सना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फ्रॉड फोन कॉल्स येत होते. ही गोष्ट जेव्हा भारत सरकरच्या निदर्शनास आली तेव्हा हे कॉल्स रोखण्यासाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
![WhatsApp Fake Calls : WhatsApp फेक कॉल रोखण्यासाठी भारत सरकारचा महत्वाचा निर्णय, युजर्सच्या सुरक्षिततेसाठी उचलले 'हे' मोठे पाऊल whatsapp fake calls fraud calls restricted by whatsapp in india tech news marathi WhatsApp Fake Calls : WhatsApp फेक कॉल रोखण्यासाठी भारत सरकारचा महत्वाचा निर्णय, युजर्सच्या सुरक्षिततेसाठी उचलले 'हे' मोठे पाऊल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/17/785e7cbce5357bd1793ac0fd996f8ebf1684328632714704_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WhatsApp : देशात बऱ्याच नागरिकांना व्हॉट्सअॅपवरून फ्रॉड कॉल्स (WhatsApp Fake Calls) येत आहेत. या कॉल्सच्या माध्यमातून अनेकजणांची फसवणूकही झाली आहे. यामुळे भारत सरकारने ही फसवणूक रोखण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. केंद्रीय दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या प्रकारच्या फसवणूकीला रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप कंपनीच्या संपर्कात आहेत. त्यांनी मंगळवारी सांगितले की, मेटाची मालकी असणाऱ्या व्हॉट्सअॅपच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मॅसेजिंग सर्व्हिसवरून या फ्रॉड मोबाईल क्रमांकाला डिरजिस्टर करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. या फ्रॉड कॉल्सवरून अनेकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. यापूर्वीच अशा क्रमांकाच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. ही माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्र्यानी तेव्हा सांगितले जेव्हा त्यांना फ्रॉड कॉल्सना आळा घालण्यासाठी भारत सरकारने नेमकी कोणती कारवाई केली आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
इतर मॅसेजिंग प्लॅटफॉर्मसोबत सुरू आहे चर्चा
काही दिवसापूर्वी बऱ्याच भारतीय व्हॉट्सअॅप युजर्सना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फ्रॉड कॉल्स येत होते. यामुळे युजर्सना त्रासही सहन करावा लागला होता. या फेक कॉल्सचा सुरूवातीचा क्रमांक +82 आणि +62 असा होता. या क्रमांकावरून फोन केले जात होते. मात्र हे फोन कॉल्स येण्यामागचं नेमके कारण समजू शकले नाही. परंतु, या सर्व प्रकाराकडे तज्ज्ञांनी एका नवीन गुन्हेगारी प्रकरणासारखं पाहिलं होतं. 'मिंट'च्या एका रिपोर्टनुसार, या प्रकरणी भारत सरकारने नेमकी कोणती कारवाई केली आहे, असं केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी बैष्णव यांना प्रश्न विचारण्यात होता. यानंतर त्यांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मॅसेजिंग सर्व्हिसवरून या फ्रॉड क्रमांकाला डिरसिस्टर करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. पुढे ते म्हणाले की, 'भारत सरकारने फ्रॉड युजर्सना आळा घालण्यासाठी टेलिग्राम आणि इतर मॅसेजिंग प्लॅटफॉर्म सोबत चर्चा सुरू आहे.'
या प्रकरणावर व्हॉट्सअॅपचं काय म्हणणे आहे?
'मिंट'च्या वृत्तानुसार, केंद्रीय दूरसंचार मंत्र्याच्या प्रतिक्रियेनंतर व्हॉट्सअॅपने मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मकडून फ्रॉड कॉलिंगची प्रकरणे दूर करण्यासाठी भारत सरकारसोबत चर्चा सुरू आहे. तसेच,आम्ही वेळोवेळी युजर्सच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊ आणि त्यांना जागरूक करत राहू. यासोबत ब्लॉक आणि रिपोर्ट, टू फॅक्टर व्हेरिफिकेशनसारख्या इन बिल्ट सिक्युरिटी टूल्स ऑफर करत राहू. त्यामुळे फ्रॉडिंगला काही प्रमाणात आळा बसणार आहे.
सरकार डिजिटल डेटा प्रोटेक्शन कायद्यावर करत आहे काम
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की, मोबाईलचा दुरूपयोग करून ओळखपत्राची चोरी करणे, केवायसी आणि बँक डिटेल्स मागवून फसवणूक केली जाऊ शकते. या फसवणूकीला आळा घालण्यासाठी एका पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, 'भारत सरकार एका डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदे बनवण्यासाठीही काम करत आहे.'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)