WhatsApp Channel : आता व्हॉट्सॲप चॅनल्स नव्या रूपात दिसणार; पिनिंग फीचरही होतंय रोल-आऊट
WhatsApp Channel : यावेळी व्हॉट्सॲपने आपल्या चॅनेलशी संबंधित वैशिष्ट्ये आणण्यास सुरुवात केली आहे.
WhatsApp Channel : व्हॉट्सॲप (Whatsapp) सतत आपल्या ग्राहकांसाठी ॲपमध्ये नवनवीन बदल करत असते. तसेच अनेक वैशिष्ट्य आणि फिचर्सही जोडत असतं. WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्या वैशिष्ट्यांमुळे ते आणखी लोकप्रिय झालं आहे. एक फिचर अपडेट केल्यानंतर व्हॉट्सअप ठराविक अंतराने नवीन फिचर अपडेट करत असतं. आणि नवीन फीचर्स आपल्या ॲपमध्ये आणत राहतं, जेणेकरून यूजर्स या ॲपकडे आकर्षित राहतील.
व्हॉट्सॲप चॅनेलचे नवीन रूप
यावेळी व्हॉट्सॲपने आपल्या चॅनेलशी संबंधित वैशिष्ट्ये आणण्यास सुरुवात केली आहे. WABetaInfo या व्हॉट्सॲपबद्दल अपडेट्स देणाऱ्या वेबसाईटनुसार, व्हॉट्सॲपने आपले चॅनल अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. एक नवीन इंटरफेस म्हणजेच WhatsApp चॅनलचा नवा लूक आणला जात आहे, जो जुन्या डिझाइनपेक्षा खूप वेगळा दिसेल.
याशिवाय व्हॉट्सॲप चॅनल पिन करण्याचे फीचरही सुरू झाले आहे. आतापर्यंत, यूजर्स त्यांच्या आवडत्या चॅट बॉक्सला व्हॉट्सॲपमध्ये पिन करू शकत होते, ज्याद्वारे त्यांना व्हॉट्सॲप उघडल्यानंतर त्यांच्या आवडत्या व्यक्तीचे किंवा गटाचे चॅट शोधण्याची आवश्यकता नाही, कारण ते शीर्षस्थानी असते.
तुम्ही तुमचे आवडते चॅनेल पिन करू शकाल
त्याचप्रमाणे व्हॉट्सॲपने चॅनल पिन करण्याचे फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत कंपनीने हे फीचर अँड्रॉईड बीटा व्हर्जनच्या काही निवडक युजर्ससाठी आणले होते, पण आता कंपनीने सामान्य युजर्ससाठीही हे खास फीचर रोल आउट करायला सुरुवात केली आहे.
व्हॉट्सॲप यूजर्सना लवकरच व्हॉट्सॲप चॅनलचा नवा लूक पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबत यूजर्स त्यांच्या आवडत्या चॅनलला पिन देखील करू शकतात, त्यानंतर यूजर्सना त्यांच्या आवडत्या चॅनेलचे अपडेट शोधण्याची गरज नाही.
महत्त्वाच्या बातम्या :