(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UPI : चुकीच्या UPI आयडीवर पाठवलेले पैसे कसे परत मिळवायचे घ्या, जाणून सविस्तर
अनेक वेळा घाईत, आम्ही चुकीच्या UPI आयडीवर पैसे भरतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला ही समस्या टाळण्याचे सोपे उपाय सांगत आहोत.
How to Retrieve Wrong UPI Payment : आजकाल सगळ्या गोष्टी आॅनलाईन (Online) पद्धतीने केल्या जातात. आता अगदी पेमेंट देखील आपण आॅनलाईन पद्धतीने करतो. मात्र कधी कधी घाईगडबडीत आपण चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करतो. अशा वेळी आपण काय करावे हे आपल्या लक्षात येत नाही. मात्र यावेळी घाबरून जायचे काही कारण नाही.त्याकरता या काही सोप्या टिप्स फाॅलो करा.
UPI अॅप सपोर्टवर इन्स्टंट मेसेज पाठवा
तुम्ही घाईघाईत चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर केले असल्यास, सर्वप्रथम तुम्हाला GPay, PhonePe, Paytm किंवा UPI अॅपच्या कस्टमर केअर सपोर्टला कॉल करून माहिती द्यावी लागेल. तुम्ही कोणत्या चुकीच्या UPI आयडीने चुकून किती पैसे ट्रान्सफर केले हे तुम्हाला सांगावे लागेल.
NPCI (National Payments Corporation of India) पोर्टलवर तक्रार कशी करावी?
UPI अॅपच्या कस्टमर केअर सपोर्टकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्यास तुम्ही NPCI पोर्टलवर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता.
अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदवा
- सर्व प्रथम NPCI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- येथे तुम्हाला What we do नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्या पेजवरील UPI वर क्लिक करा.
- नंतर Dispute Redressal Mechanism वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तक्रार विभाग दिसेल
- आता तुम्हाला व्यवहाराचे स्वरूप निवडावे लागेल.
- आता तुम्हाला इश्यू सेक्शनमध्ये "Incorrectly transferred to another account" निवडावे लागेल. यासोबतच तुम्हाला सर्व माहिती नीट भरून तुमची तक्रार नोंदवावी लागेल.
बँकेशी संपर्क साधा
येथे तक्रार करूनही तुमची समस्या दूर झाली नसेल, तर अशा स्थितीत तुम्ही ताबडतोब बँकेत जावे. तुम्हाला तिथे जाऊन तक्रार करावी लागेल किंवा शक्य असल्यास ब्राँच मॅनेजरला भेटावे लागेल. तिथे जाऊन लेखी तक्रार द्यावी लागेल. तुम्ही ही तक्रार PSP/TPAP अॅपवर नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही बँकेत जाऊनही याबाबत तक्रार करू शकता.
RBI कडे तक्रार कशी करावी?
तुम्ही तुमची तक्रार RBI कडे तीन वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. तुम्ही तुमची तक्रार RBI कडे लेखी नोंदवू शकता. यासह, तुम्ही तुमची तक्रार RBI कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टम (CMS) वर नोंदवू शकता किंवा तुम्ही संबंधित कार्यालयात कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता.