एक्स्प्लोर

आता Swiggy वरून जेवण मागवणं झालं महाग, फक्त 'या'ऑर्डर्सवर मिळणार सुट

Swiggy: तुम्ही जर खाण्याचे शौकिन आहात आणि Swiggy वरून जेवण ऑर्डर करत असाल, तर आता एक्स्ट्रा चार्ज द्यावं लागणार आहे. परंतु कंपनीकडून काही ऑर्डर्सवर सुटही दिलं जातं आहे.

Swiggy Update: सध्या बहुतांश जणांना बदलत्या लाईफस्टाईलमध्ये स्वत: ला सामावून घेतल्याशिवाय पर्याय नसतो.  विशेषत: तुम्ही शहरात राहत असला, तर  शहरी लाईफस्टाईलशी स्वत: जुळवून घ्यावं लागतं. तुम्ही एखादया कंपनीत कामाला असाल, तर वेळेत ऑफिसला जाणं गरजेचं असतं. पण सगळ्यामध्ये घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर प्रवास करून प्रचंड धावपळ होते. यामुळे थकवा येतो आणि जेवण बनवण्याची इच्छा राहत नाही. अशावेळी इतर पर्यायांचा शोध घेतला जातो. शहरात जेवण मागवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. यासाठी घरी बसून आपल्या आवडीची डिश Swiggy आणि  Zomato सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफाॅर्मवरून मागवण्याची सुविधा उपलब्धही उपलब्ध आहे. तुमच्यातील सर्वांनी कधी ना कधी Swiggy वरून जेवण ऑर्डर  केलं असणार. पण आता स्विगीवरून जेवण ऑर्डर करणं महाग पडू शकतं. कारण स्विगीनं काही शहरात जेवण ऑर्डरवर चार्जेस वाढवले आहेत.  हे चार्जेस नेमकं किती वाढवले?  जेवण किती महाग पडू शकत? हे जाणून घेऊया...

प्रत्येक ऑर्डरमागे इतका चार्ज द्यावा लागणार

कंपनीने प्रत्येक ऑर्डरमागे दोन रूपये इतका एक्स्ट्रा चार्ज लागू केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्लॅटफाॅर्म  दोन रूपये द्यावे लागतील. सध्या हे बंगळूरू आणि हैदराबाद शहरातील ग्राहकांना हे चार्जेस लागू पडणार आहेत. या शहारात राहणाऱ्या ग्राहाकांनी कितीही जेवण ऑर्डर केलं, तर  प्रत्येक ऑर्डरमागे दोन रूपये एक्स्ट्रा चार्ज द्यावं लागणार आहे. या चार्जेसच्या बदल्यात कंपनी ग्राहकांना चांगली सेवा प्रधान करण्यावर भर देणार आहे. यामुळे पूर्वीपेक्षा चांगली सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. मुंबई आणि दिल्ली शहरात अद्याप सेवा शुल्क वाढवले नाही. परंतु, लवकरच देशातील बहुतेक सर्व शहरात कंपनी चार्जेस लागू करू शकते.

या जेवणाच्या ऑर्डर्सवर एक्स्ट्रा चार्ज नाहीत

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना फक्त  फूड आयटम्सवर दोन रूपये चार्ज द्यावं लागणार आहे. Swiggy Instamart वर हे चार्जेस लागू नाहीत. स्विगी  दिवसाला देशभरातून 20 लाखपेक्षा जास्त ऑर्डर सप्लाय करत असते.  दरम्यान रमजान महिन्यात हैद्राबाद शहरातील लोकांनी  10 लाख बिर्याणी आणि  4 लाख प्लेट हलीम ऑर्डर केलं होतं. गेल्या महिन्यात कंपनीने सांगितल्यानुसार, स्विगीने गेल्यावर्षी 33 मिलियन इडलीच्या डिश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे.

स्विगीने 380 कर्मचाऱ्यांना काढलं होतं कामारून

यावर्षीच्या सुरूवातीला कंपनीच्या सीईओने जवळपास 380  कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. कंपनीच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचं कंपनीनेच सांगितले होतं.  त्यामुळे आता हे नवीन एक्स्टा चार्ज लागू केल्यामुळे कंपनी मोठी मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat Majha Katta| देशमुखांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात माझा कट्टावरRaj Thackeray Full Speech Prabhadevi:लेकासाठी बापाचं पहिलं भाषण;राज ठाकरेंनी धू धू धुतलं : ABP MajhaAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : सना मलिकांना उमेदवारी कशी मिळाली? Nawab Malik ExclusiveYogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Embed widget