(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SIM Card : सिम कार्डमुळे तुम्हाला होऊ शकते तुरुंगवारी! चुकूनही 'हे' काम करू नका
Sim Card Use : सिम कार्ड वापराबाबत अनेकांना नियमांची माहिती नसते. सिम कार्ड वापरताना केलेली एक चूक तुम्हाला तुरुंगातही डांबू शकते.
Sim Card : तुमच्या मोबाईलमधील सिम कार्डमुळे (Sim Card) तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्ही सिम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला नवीन नियमांची माहिती हवी. एका चुकीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. सिमकार्ड वापरताना अनेकजण नकळत अशा नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात.
सिम कार्ड हरवल्यास तक्रार करा...
सिमकार्ड हरवल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी लागेल. काही ठिकाणी पोलिसांकडून ही सेवा ऑनलाईनही दिली जात आहे. म्हणजेच तुम्ही कुठेही न जाता थेट सिमकार्डची तक्रार घरी बसून नोंदवू शकता. यानंतर, सिम कार्ड हरवल्यासही तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही.
दुसऱ्याच्या नावावर सिम खरेदी करणे, त्याचा वापर करणे...
सिमकार्ड वापरण्यापूर्वी, सिम तुमच्या नावावर असले पाहिजे हे तुम्हाला माहीत असावे. तुम्ही दुसऱ्या युजर्सच्या नावाने सिम वापरल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. त्यामुळे, तुमच्या स्वत:च्या नावाने जारी केलेले सिम कार्ड तुम्हाला मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय, तुम्ही तुमच्या नावाने जारी केलेले सिम इतर कोणत्याही व्यक्तीला मिळता कामा नये. हा कायदाही गुन्ह्याच्या श्रेणीत येतो.
अशी घ्या काळजी...
ई-सिम वापरून तुम्ही स्वतःची बचत देखील करू शकता. वास्तविक हे फिजिकल सिम कार्ड नाही. यामुळे तुम्हाला फारशी चिंता करावी लागत नाही. काही महिन्यांपूर्वी एक अहवाल समोर आला होता. या अहवालानुसार, ई-सिमच्या मदतीने स्मार्टफोन मिळवणे सोपे होते, असे म्हटले होते. याशिवाय तुमच्या सिमचा कोणीही गैरवापर करू शकत नाही. अमेरिकेतील बहुतेक लोक फक्त ई-सिम वापरणे पसंत करतात. सध्या तरी भारतात ही सुविधा उपलब्ध नाही. तुमचे सिम कार्ड हरवल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्याचा दुरुपयोग करू शकतील. खंडणीखोरी, आर्थिक गैरव्यवहारासाठी सिम कार्डचा वापर होऊ शकतो. त्यामुळे सिम कार्ड हरवल्यास त्याची तक्रार पोलिसांमध्ये करावी. सिम कार्डशी संबंधित योग्य काळजी घ्यावी.