(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samsung Galaxy F14 5G Launched: सॅमसंगने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy F14 5G Launched: कोरियन मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे.
Samsung Galaxy F14 5G Launched: कोरियन मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. ज्याची विक्री 30 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन ऑर्डर करू शकाल. कंपनीने 6000 mAh बॅटरी, 6.6 इंच डिस्प्ले आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजसह Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याच स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Samsung Galaxy F14 5G Launched: किती आहे किंमत?
कंपनीने Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोन 4/128GB आणि 6/128GB मध्ये लॉन्च केला आहे. मोबाईल फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 14,490 रुपये आहे तर टॉप एंड व्हेरिएंटची किंमत 15,990 रुपये आहे. कंपनी ग्राहकांना मोबाईल फोनवर काही सूटही देत आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ग्राहकांना 1,500 रुपयांची सूट दिली जात आहे. सूट मिळाल्यानंतर बेस व्हेरिएंटची किंमत 12,990 रुपये आणि टॉप एंड व्हेरिएंटची किंमत 14,490 रुपये आहे. ग्राहक हा मोबाईल फोन काळ्या, हिरव्या आणि जांभळ्या रंगात खरेदी करू शकतात.
Samsung Galaxy F14 5G Launched: स्पेसिफिकेशन
बजेट स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला यात 6.6-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. जो 90hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी मोबाईल फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा दुसरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमधील 6000 mAh बॅटरी 25W चार्जिंगसह येते.
Samsung Galaxy F14 5G Launched: सर्वात महत्वाची गोष्ट
या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये तुम्हाला पॉवर अडॅप्टर मिळणार नाही. मोबाईल फोनसाठी तुम्हाला बाजारातून वेगळे 25W USB-C पोर्ट चार्जर खरेदी करावे लागेल, ज्याची किंमत 1,149 रुपये आहे.
OnePlus Nord CE 3 Lite 5G 4 एप्रिल रोजी होणार लॉन्च
चीनी स्मार्टफोन निर्माता OnePlus 4 एप्रिल रोजी बाजारात आपला परवडणारा फोन OnePlus Nord CE 3 Lite 5G लॉन्च करू शकते. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 6.7 इंच FHD प्लस डिस्प्ले, 8GB रॅम आणि 5000 mAh बॅटरी मिळू शकते.
इतर महत्वाची बातमी: