एक्स्प्लोर
आयफोन 7 आणि 7 प्लस खरेदीतील फायदे-तोटे
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173808/IPHONE7-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/14
![तुम्ही जर आयफोन 7 किंवा आयफोन 7 प्लस खरेदी करणार असाल, तर तुम्हाला या नव्या स्मार्टफोनसंदर्भातील काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, आयफोनच्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत या नव्या मॉडेलमध्ये जास्त बदल केले नसले, तरी उत्तम दर्जाचा कॅमेरा, फास्ट प्रोसेसर, चांगला बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173808/IPHONE7-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही जर आयफोन 7 किंवा आयफोन 7 प्लस खरेदी करणार असाल, तर तुम्हाला या नव्या स्मार्टफोनसंदर्भातील काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, आयफोनच्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत या नव्या मॉडेलमध्ये जास्त बदल केले नसले, तरी उत्तम दर्जाचा कॅमेरा, फास्ट प्रोसेसर, चांगला बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.
2/14
![नव्या आयफोनमध्ये लेटेस्ट 64 बीट A-10 फ्यूजन चिपचा वपार करण्यात आला आहे. या चिपमुळे तुमचा स्मार्टफोन पूर्वीच्या तुलनेत 50 टक्के फास्ट होतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173806/apple-compressed-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नव्या आयफोनमध्ये लेटेस्ट 64 बीट A-10 फ्यूजन चिपचा वपार करण्यात आला आहे. या चिपमुळे तुमचा स्मार्टफोन पूर्वीच्या तुलनेत 50 टक्के फास्ट होतो.
3/14
![या दोन्ही स्मार्टफोनच्या बाबतीत स्मार्टफोन एक्सपर्टसमधूनही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनच्या खरेदीचे फायदे-तोटे काय आहेत, याची माहीती देत आहोत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173804/7141.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दोन्ही स्मार्टफोनच्या बाबतीत स्मार्टफोन एक्सपर्टसमधूनही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनच्या खरेदीचे फायदे-तोटे काय आहेत, याची माहीती देत आहोत.
4/14
![आयफोन 7 किंवा 7 प्लस का खरेदी करु नये?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173802/6121.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन 7 किंवा 7 प्लस का खरेदी करु नये?
5/14
![आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये रेटिना एचडी डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. हाच डिस्प्ले आयफोन 6 एस आणि 6 प्लसमध्येही आहे. मात्र, कंपनीचा दावा आहे की, या नव्या फोनची कलर क्वॉलिटी पूर्वीच्या स्मार्टफोनच्या तुलनेत चांगली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173800/4191.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये रेटिना एचडी डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. हाच डिस्प्ले आयफोन 6 एस आणि 6 प्लसमध्येही आहे. मात्र, कंपनीचा दावा आहे की, या नव्या फोनची कलर क्वॉलिटी पूर्वीच्या स्मार्टफोनच्या तुलनेत चांगली आहे.
6/14
![आयफोन 7 च्या रॅममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून आयफोन 6 एस प्रमाणेच 2 जीबी रॅम देण्यात आली आहे. मात्र, आयफोन 7 प्लसमध्ये पूर्वीच्या तुलनेत 3 जीबी रॅम देण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173758/1931.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन 7 च्या रॅममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून आयफोन 6 एस प्रमाणेच 2 जीबी रॅम देण्यात आली आहे. मात्र, आयफोन 7 प्लसमध्ये पूर्वीच्या तुलनेत 3 जीबी रॅम देण्यात आली आहे.
7/14
![आयफोन 7 किंवा 7 प्लस का खरेदी करावा?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173756/1641.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन 7 किंवा 7 प्लस का खरेदी करावा?
8/14
![आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस या नव्या स्मार्टफोनचा लूक आणि डिझाइनमध्ये कोणतेही नवे बदल नाहीत. या दोन्ही स्मार्टफोनचा लूक आयफोन 6 एस आणि आयफोन 6 प्लससारखाच आहे. या नव्या मॉडेलमध्ये काही ठराविक बदल करण्यात आले आहेत. उदा. स्टेरीओ स्पीकर, 7 प्लसमध्ये ड्यूअल रिअर कॅमेरा इत्यादीमध्ये बदल करण्यात आले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173755/1541.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस या नव्या स्मार्टफोनचा लूक आणि डिझाइनमध्ये कोणतेही नवे बदल नाहीत. या दोन्ही स्मार्टफोनचा लूक आयफोन 6 एस आणि आयफोन 6 प्लससारखाच आहे. या नव्या मॉडेलमध्ये काही ठराविक बदल करण्यात आले आहेत. उदा. स्टेरीओ स्पीकर, 7 प्लसमध्ये ड्यूअल रिअर कॅमेरा इत्यादीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
9/14
![तसेच स्मार्टफोनच्या नव्या मॉडेलमध्ये उत्तम दर्जाच्या बॅटरीचा वापर केल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र, आयफोन 6 एस आणि आयफोन 6 एस प्लसच्या तुलनेत याची बॅटरी 1 ते 2 तासच जास्त काम करु शकते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173753/1341.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच स्मार्टफोनच्या नव्या मॉडेलमध्ये उत्तम दर्जाच्या बॅटरीचा वापर केल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र, आयफोन 6 एस आणि आयफोन 6 एस प्लसच्या तुलनेत याची बॅटरी 1 ते 2 तासच जास्त काम करु शकते.
10/14
![अॅपलने नव्या आयफोनमधून 3.5 एमएम जॅक काढून, त्याजागी वायरलेस इअरपॅडसचा वापर केला आहे. हे वायरलेस इअरपॅड लूकच्या बाबतीत दिसायला सुंदर असले तरी त्याची गहाळ होण्याची शक्यता जास्त आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173750/991.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपलने नव्या आयफोनमधून 3.5 एमएम जॅक काढून, त्याजागी वायरलेस इअरपॅडसचा वापर केला आहे. हे वायरलेस इअरपॅड लूकच्या बाबतीत दिसायला सुंदर असले तरी त्याची गहाळ होण्याची शक्यता जास्त आहे.
11/14
![आयफोनचं होम बटन हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मात्र, पहिल्यांदाच अॅपलने यामध्ये बदल करुन टॅप्टिक इंजनने युक्त 'फोर्स टच सेंसिटिव्ह' होम बटन दिले आहे. यामुळे नव्या आयफोनचं होम बटन क्लिक केल्यावर 3D टचचा प्रतिसाद मिळेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173747/204.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोनचं होम बटन हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मात्र, पहिल्यांदाच अॅपलने यामध्ये बदल करुन टॅप्टिक इंजनने युक्त 'फोर्स टच सेंसिटिव्ह' होम बटन दिले आहे. यामुळे नव्या आयफोनचं होम बटन क्लिक केल्यावर 3D टचचा प्रतिसाद मिळेल.
12/14
![आयफोन 6 एस आणि आयफोन 6 एस प्लसप्रमाणेच नव्या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. पूर्वीच्या तुलनेत या कॅमेराच्या क्वॉलिटीमध्ये चांगले बदल दिसतील. तसेच दोन्ही फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनचा वापर करण्यात आला आहे. तर आयफोन 7 प्लसमध्ये दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये 7 मेगापिक्सेलचा फ्रंट एचडी कॅमेरा देण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173745/000_FY4UC.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन 6 एस आणि आयफोन 6 एस प्लसप्रमाणेच नव्या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. पूर्वीच्या तुलनेत या कॅमेराच्या क्वॉलिटीमध्ये चांगले बदल दिसतील. तसेच दोन्ही फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनचा वापर करण्यात आला आहे. तर आयफोन 7 प्लसमध्ये दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये 7 मेगापिक्सेलचा फ्रंट एचडी कॅमेरा देण्यात आला आहे.
13/14
![जर तुम्हाला सिनेमा पाहणे किंवा गेम खेळण्याचा छंद असेल, तर तुम्हाला हा नवा स्मार्टफोन नक्की आवडेल. कारण या नव्या फोनमधील स्टेरिओ स्पीकर्स आवाजाचा वेगळाच अनुभव देतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173743/000_FY4TT1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्हाला सिनेमा पाहणे किंवा गेम खेळण्याचा छंद असेल, तर तुम्हाला हा नवा स्मार्टफोन नक्की आवडेल. कारण या नव्या फोनमधील स्टेरिओ स्पीकर्स आवाजाचा वेगळाच अनुभव देतात.
14/14
![आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये इंटरनल मेमरी पूर्वीपेक्षा दुपटीने वाढवण्यात आली आहे. या दोन्ही स्मार्टफोनचे 32 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबीची इंटरनल मेमरीचे व्हेरिएंट उपलब्ध आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/12173740/000_FY4TT.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये इंटरनल मेमरी पूर्वीपेक्षा दुपटीने वाढवण्यात आली आहे. या दोन्ही स्मार्टफोनचे 32 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबीची इंटरनल मेमरीचे व्हेरिएंट उपलब्ध आहेत.
Published at : 12 Oct 2016 05:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)