एक्स्प्लोर

Oppo Reno 10 Series: Oppo चे 'हे' तीन भन्नाट स्मार्टफोन जुलै महिन्यात होणार लाँच, जाणून घ्या किंमती

Oppo Reno 10 Series Launch Date : स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो भारतात 10 जुलै रोजी 3 स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन Oppo Reno 10 या सीरिजमधील आहेत. या फोनच्या भन्नाट फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घ्या

Oppo Reno 10 Series Launch Date : अँड्रॉईड स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो जुलै महिन्यात Oppo 10 series मधील 3 स्मार्टफोन लाँच करणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. अशातच ओप्पो भारतात 10 जुलै रोजी ओप्पो रेनो 10 सीरिज (Oppo Reno 10 series) चा स्मार्टफोन लाँच करणार आहे. यामध्ये Oppo Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro Plus या तीन स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीने हा स्मार्टफोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध केला आहे. नुकतंच या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी माहिती लीक झाल्याचं समोर आलं आहे. या लीक माहितीनुसार, कंपनी Oppo Reno 10 सीरिज 30 हजार रुपये किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. ही किंमत 50 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. यामुळे या सीरिजमधील टॉप मॉडलची किंमत 45 ते 50 हजार रुपये असू शकते. कंपनी या फोनमध्ये भन्नाट फीचर उपलब्ध करुन देणार आहे.  या स्मार्टफोनविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Oppo Reno 10 सीरिज आणि स्पेसिफिकेशन्स 

ओप्पो ही चिनी स्मार्टफोन कंपनी आहे. यापूर्वीच कंपनीने चीनमध्ये Oppo Reno 10  सीरिज स्मार्टफोन लाँच केला आहे. यामुळे स्मार्टफोनशी संबंधित बरेच स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत. अर्थात, कंपनीकडून भारतात लाँच करताना स्मार्टफोनमध्ये बदल केला जाऊ शकतो.   

Oppo Reno 10 Series मध्ये FHD+ रिझॉल्यूशनसह 6.7 इंच अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे.
Oppo Reno 10 Series मध्ये डिस्प्लेसाठी 120hz चा रिफ्रेश रेट सपोर्टेड आहे.
Oppo Reno 10 Series मध्ये ट्रिपल सेटअप कॅमेरा मिळणार आहे. यामध्ये 64+32+8MP असा कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा असेल. 
Oppo Reno 10 Series चा स्मार्टफोन Snapdragon 778G SoC (A system-on-a-chip) या प्रोसेसरवर चालणार आहे.
Oppo Reno 10 Series मध्ये 4,600 mAh इतक्या क्षमतेची बॅटरी आहे.
Oppo Reno 10 Series मध्ये 80 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

या सीरिजमधील टॉप मॉडल Oppo Reno 10 Pro Plus च्या स्मार्टफोनमध्ये 50MP + 64MP + 8MP  असा ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. प्रो मॉडेल फोन MediaTek Dimensity 8200 SOC या प्रोसेसरसाठी सपोर्टेड आहे. तर प्रो प्लस मॉडेलमध्ये Snapdragon 8+ Gen 1 SoC या  प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. ओप्पोच्या Reno 10 सीरिज मॉडेलमध्ये 4,600mAh इतकी बॅटरी क्षमता आहे. तर Reno 10 प्रो प्लस मॉडेलमध्ये 4,700mAh इतकी बॅटरी क्षमता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 100 वॅटच्या फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टेड आहेत. 

11 जुलै रोजी नथिंगचा स्मार्टफोन होणार लाँच

10 जुलै रोजी ओप्पोचे Oppo Reno 10 Series चे मॉडेल लाँच होतील. यानंतर 11 जुलै रोजी भारतात Nothing Phone 2 लाँच करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन सांयकाळी 8:30 वाजता लाँच करण्यात येणार आहे. यानंतर हा स्मार्टफोन रात्री 9 वाजल्यानंतर फ्लिपकार्टवरुन विकत घेता येईल. सध्या या फोनची प्री बुकिंग सुरु करण्यात आली आहे. यासाठी 2,000 रुपये इतकी रक्कम भरावी लागेल. यानंतर तुम्हाला फोनची प्री बुकिंग करता येणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :

Oppo Reno 7 सीरिजमधला स्वस्त स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, जाणून घ्या याचे फीचर्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget